शेळूवाडा येथील मुस्लिम बांधवांना अंत्यसंस्कारासाठी करावा लागतो धोकादायक प्रवास

34

 

*कारंजा लाड / असलम मामदानी*

तालुक्यातील शेलूवाडा येथील मुस्लिम समाजातील स्मशानभूमी नदी पलीकडे असुन नदीला या दिवसात कमरेपर्यंत पाणी असते. अशावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांना कसरतीने नदीतून मार्ग काढुन स्मशानभूमीत जावं लागते .
अंतिम संस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना सुध्दा जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
दि. २६ ऑक्टों. रोजी एका व्यक्तीचा मृत्यु झाला होता तो मृत्यू देह नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीत पाणी साचुन असल्याने अडचणींचा सामना त्यांना करावा लागला.
त्यांनी वारंवार तहसीलदार कारंजा तसेच लघुपाटबंधारे विभाग यांना निवेदन देऊन तक्रार ही केल्यात परंतु या विषयावर कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही मुस्लिम समाज बांधवाच्या रीती रिवाजानुसार धार्मिक विधी करून अंतिम संस्कार करता आला नाही त्यामुळे बरेच नातेवाईकांना बाहेरच थांबावे लागले त्यांना अंतिम दर्शन सुद्धा घेता आले नाही .
गावातील संपूर्ण शेतकऱ्यांना सुद्धा जाणे येण्याचा हा रस्ता असल्याने खूप अडचण होत आहे शेतकऱ्यांनाही खूप त्रास होत असुन संबंधित विभागाने पर्यायी व्यवस्था करावी अशी मुस्लिम बांधवांच्या वतीने मागणी होत आहे.