कारंजा/प्रतिनिधी
*[असलम मामदानी]*
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस उर्दू महिन्याच्या १२ तारखेला म्हणजे ९ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला त्यानिमित्त स्थानीय कागजीपुरा कारंजा इमरान किराणा येथे दुपारी २ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गरजुवंत रुग्णांना विविध आजारावर निःशुल्क तपासणी व औषधोपचार व्हावा या सामाजिक भावनेतून फ्री मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यावेळी या कॅम्पचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो.युसुफ पुंजानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ.आसिफ अकबानी डॉ. मोहम्मद अजमल डॉक्टर शकिल मिर्झा डॉ. मुज्जम्मील खान डॉ.शाहिद शेख व डॉ. सोहेल कादरी यांनी रुग्ण तपासणी करून रुग्णांना औषधोपचार दिला यावेळी उपस्थित रुग्णांना मोफत मेडिकल चेकअप नंतर निशुल्क औषधे सुद्धा देण्यात आली या फ्री मेडिकल चेकअप कॅम्प मध्ये पाचशेच्या वर रुग्णांनी लाभ घेतला असून सदर मेडिकल चेकअप मध्ये औषधोपचार घेतलेल्या गरजुवंत रुग्णांनी आयोजक हाजी मो.युसुफ पुंजानी यांचे आभार व्यक्त केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी शोएब खान एमडी जावेद शेख नवेद, शेख,समीर मिर्झा, नगरसेवक जाकीर शेख, नगरसेवक सय्यद मुजाहिद, मुजाहिद खान, अब्दुल एजाज, यांचेसह एम डी मेडिकल आणि एम डी जावेद शेख फार्मसी ग्रुपच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.