अनुसूचित जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्रीमान हर्ष चौहान साहेब नवी दिल्ली यांना,कुंसुबीचा आदिवासी प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी गंभीर तक्रार दिली.

100


संवाददाता

*36 वर्षांपासून सिमेंट कंपन्या व महसूल अधिकारी,पोलीस अधिकारी अन्याय,अत्याचार,करून त्यांना मोबदला व न्याय हक्कापासून वंचित कसे केले व करत आहेत हे दस्तऐवज पुराव्यासह श्री विनोद खोब्रागडे यांनी समजाऊन सांगीतले.*
माननीय आयोगाचा हा गंभीर प्रकार लक्षात येताच तात्काळ नोटीस काडुन,मुख्य सचिवाकडुन अहवाल मागनार,व कारवाई करु असे आश्वासन दिले.
निवेदन /तक्रार देतानां,तलाठी विनोद खोब्रागडे,सामाजिक कार्यकर्ते श्री. भारतभाऊ आत्राम,सामाजिक कार्यकर्ते श्री.धनराज कोवे,सामाजिक कार्यकर्ते श्री.गंगाधर कुंठावार, व इतर आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते.

*मानीकगड सिमेंट कंपनी,गडचांदुर,अल्ट्राटेक सिमेंट कंपनी सह दोषी अधिकारी,माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर,माननीय उपविभागीय अधिकारी राजुरा,माननीय तहसीलदार यांनी आपल्या कर्तव्यात कसुर केल्यामुळे,यांचावर फौजदारी कारवाई अट्रासिटीचा कलम 3(1)(5) नुसार करन्याची मागणी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नवी दिल्ली श्री.हर्ष चौहान साहेब यांना निवेदन/तक्रार देऊन केली आहे.*

*जबाबदार व जागृत नागरिक तथा तलाठी विनोद खोब्रागडे रा.वरोरा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर.*