सत्तेसाठी किती बेशरमपणा….!!बिलकीसच्या बलात्काऱ्यांचा सन्मान,समाज नपुंसक झालंय?मुस्लिम विरोधात माणुसकीलाही काळिमा..!!

140

?? *गुस्ताखी माफ*??

साभार प्राप्त श्री अशफाक शेख
वरिष्ठ पत्रकार सहारा समय औरंगाबाद

*घटना क्र.1)….* 16 डिसेंबर 2012 ची ती रात्र,दक्षिण दिल्लीच्या मोनारिका भागात खाजगी बस मध्ये मित्रा सोबत प्रवास करणाऱ्या तेवीस वर्षीय युवतीवर बस चालक सहित सहा जणांनी बलात्कार केला.या घटनेने देशभर काहूर माजवला.विरोधक भाजप नेते,ते चुरण छाप रामदेव बाबा त केंद्रीय मंत्री विके सिंग रस्त्यावर वर उतरले,देशभरातील अनेक सोकाल्ड सामाजिक महिला संस्था ते समाजीक चळवळीचे नेते ही रस्त्यावर उतरले.जनआक्रोश पाहता सरकारने निर्भयाला उपचारा साठी सिंगापूरला पाठविले. दोन दिवसा नंतर उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. *विशेष विमानाने तिचा पार्थिव अर्ध्या रात्री दिल्ली विमानतळावर आला तेव्हा माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हजर होते.काही दिवसा नंतर सहा जणांना अटक ही करण्यात आले.20 मार्च 2020 रोजी सहा पैकी चार जणांना फासा वर लटकाविण्यात आले.तेव्हा आजचे पंतप्रधान मोदींनी नारी शक्तीचा खरा विजय व सन्मान झाल्याचे ट्विट केले.महिलांना समान न्याय देत राष्ट्र घडविण्याची हाक दिली.*
? *घटना क्र.2)….* 2002 मध्ये गुजरात मधील क्रूर दंगली दरम्यान बिलकीस बानो गँगरेप जगभर गाजले. *अकरा पिपाशु हरामखोरांनी गर्भवती 19 वर्षीय बिलकीस बानो वर बलात्कार केला.तिच्या छोट्या मुलीस आपटून ठार केले.तिच्या दहा बारा नातेवाईकांची अक्षरश कत्तल केली.अकरा जणांना जन्मठेपची शिक्षा ठोठावण्यात आली.*
? *घटना क्र.3)…* 4 जून 2017 राजी उत्तरप्रदेशच्या उन्नाव बलात्कार लक्षात असेलच…..बलात्कारी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर होता.निरागस मुलीवर बलात्कार केला व हत्या केली.नंतर त्याला जन्मठेप झाली. *या घटनेतील पीडित मुलीच्या बापाला न्यायालयीन कोठडीत हत्या करण्यात आली,नंतर पीडितेच्या दोन नातेवाईकांना अपघातात घडवून मारण्यात आले.सेंगरने चक्क मुख्यमंत्री घरात आश्रय घेतल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या.*
? *घटना क्र.4)….* जम्मू-काश्मीर राज्यात जानेवारी 2018 मध्ये एका आठ वर्षीय आदिवासी मुस्लिम मुलीवर मंदिराच्या पुजाऱ्या सोबत सहा नारी पिपाशूंनी बलात्कार करून त्या कोवळ्या मुलीस मारून टाकले. *स्थानिक पक्षांनी आवाज उठविला असता बलात्कारी पिपाशूंच्या समर्थनार्थ दोन भाजप मंत्र्यांनी आंदोलन केले.नंतर सहा जणांना अखेर कठोर शिक्षा झाली.*
? *घटना क्र.5)….*?14 सप्टेंबर 2020 रोजी उत्तरप्रदेश हाथरस जिल्ह्यात 19 वर्षीय दलित मुलीवर गँगरेप करण्यात आले.उपचारा दरम्यान दिल्लीत मरण पावली.प्रशासनाने रात्रीत गुपचूप अंतिम संस्कार केला. पीडितेच्या नातेवाईकांना आमिषे दिली गेली. *तिच्या आई;वडिलांना चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी बोंबलू नका,नंतर तुम्हाला वाचवायला कोण येणार?म्हणून धमकी दिली.राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मीडियात बोंबाबोंब झाली.नंतर पोलिसांनी काररवाई केली.* सुप्रीम कोर्टाने प्रशासनास झापले.
? *वरील पाचही बलात्काराच्या घटने पैकी पहली घटना कांग्रेस सत्तेत असतांना घडली.नंतरच्या चारही घटना भाजप सत्तेत असतांना समोर आल्या.पाचही घटनेत पीडितांना न्याय मिळाला.फरक एवढाच की ज्या राज्यातील पंतप्रधान व गृहमंत्री आहेत त्या राज्यात बिलकीसच्या बलात्कारी व मुलीच्या मारेकऱ्यांना पंधरा ऑगस्ट रोजी जाहीर माफी देऊन जेलातून सुटका केली,हे दुर्दैव नाही तर काय?.विशेष म्हणजे सर्व अकरा नराधमांचा जाहीर सत्कार,सन्मान समाजाने केला. त्याही वरती महिलांनीच नराधमांचे औक्षण करत फुलांच्या गजरात सत्कार केला.आज पर्यंत कोणत्याही समाजात बलात्कारी नाराधमांचे सत्कार तुम्ही पाहिलेत का?तसं घडलंय गुजरातेत। ….किती मुस्लिम विरोध,तिरस्कार व कट्टरपणा आहे ना…!!विशेष म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी पुन्हा नारीशक्तीचं गुणगान केलं.दुसरी कडे त्यांच्याच राज्याच्या मुख्यमंत्र्याने नारीशक्तीचं धिंडवडे काढले,निर्भया घटने नंतर बेंबी पासून बोम्बलणारा मीडिया,ते गोलमाल भोंदू रामदेव बाबा,केंद्रीय मंत्री विकेसिंग चिडीचूप आहेत.वाटलं….. त्यांना ही सत्तेच्या भांगच्या गोळ्या देण्यात आल्या.*
? *पुढील वर्षी गुजरात राज्यात निवडणूक आहेत.आता पर्यंत तुम्ही हिंदू-मुस्लिम फाळणीचे राजकारण करत सत्ता मिळवली.ठीक आहे.मात्र मुस्लिम असल्याने त्या महिलेचा न्याय हिरावण्याचा तुम्हाला अधिकार नाहीच नाही.सत्तेसाठी व विशिष्ठ समाजाला खुश करण्याचा हा जगातील पहिलाच बेशरमपणा असेल…!!मुस्लिमांचा तिरस्कार करताहेत करा….. मात्र बलात्कार करणाऱ्यांना शह देत असाल तर तुम्हाला कोणता समाज घडवायचं….एकदाच ठरवा? तुमच्या ही आई बहिणी आहेत…..त्यांना तुम्ही काय उत्तर देणार….? काय….. आम्ही सत्तेसाठी बलात्कार करणाऱ्यांना सोडलं…… विचार करा….मेडिया काय…..समाज काय….तो रात्रीला मेणबत्त्या लावणारा हायप्रोफाईल समाज…..नारी सुरक्षेसाठी बोंबा मारणारी मंत्री स्मृती इराणी….देशातील विद्वान…स्वयंघोषित महिला रक्षणाचे ढोंग करणाऱ्या महिला संघटना…कुठे आहेत..?? खरंच संवेदना हरवली आहे…..समाज नपुसंक झालंय…. मन सुन्न आहे….शरम वाटतंय…..!!!* (जयहिंद) 19-08-2022
? *अशफाक शेख,वरिष्ठ पत्रकार,सहारा समय,औरंगाबाद…..*