पाणी समस्यांसंदर्भात मनपा ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवेदन सादर.
आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ ला चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे माननीय आयुक्त यांचे नांवे असलेले निवेदन अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सादर केले. स्थानिक चपराशी कॉलनी , सिव्हिल लाईन , रामनगर भागात सुरू असलेल्या पाणी टंचाई बद्दलचे उपरोक्त निवेदन असुन त्यात मनपा कडुन १५ दिवसांपासून बंद केलेली जुनी पाईप लाईन पावसाळ्या पर्यंत पुन्हा सुरू करण्यात यावी तसेच नवीन नळ एक दिवस आड अर्धा तास येते ते नवीन नळ दररोज एक तास नियमित सुरू करण्याच्या मागणीचा उल्लेख करण्यात आला आहे. मागणी पुर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चंद्रपूर विधानसभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून सरतेशेवटी देण्यात आला आहे. यावेळी युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर, ओबीसी सेल शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल मस्की, शहर जिल्हा उपाध्यक्ष दीपक कटकोजवार, अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष बब्बू ईसा शेख, युवक जिल्हा उपाध्यक्ष समीर खान, दिनेश मिश्रा, शोभाताई भरडे, उमेश मुधलीवार यांचेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.




