Google search engine
Home Breaking News आपुलकीच्या शब्दांच्या या मूल्य कसे सांगावे जपेल हृदयी माझ्या सदैव मनोभावे.

आपुलकीच्या शब्दांच्या या मूल्य कसे सांगावे जपेल हृदयी माझ्या सदैव मनोभावे.

75

*वाढदिवसाच्या निमित्ताने, आपणा सर्वांनी मनापासून दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि सदिच्छांचा वर्षाव अनुभवताना माझं मन गहिवरून आलंय. शब्द अपुरे पडतात, कारण या केवळ शुभेच्छा नाहीत. आपल्या नात्याची, ऋणानुबंधांची आणि प्रेमाच्या अमोल बंधनांची ही साक्ष आहे. सार्वजनिक जीवनात मी जे काही करू शकलोय, ते केवळ आपली साथ आणि आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत म्हणून. आपण दिलेलं हे प्रेमच माझी खरी संपत्ती आहे. कुठल्याही पदापेक्षा, कीर्तीपेक्षा ही संपत्ती माझ्यासाठी मोलाची आहे. त्यामुळे मी केवळ आभार मानणार नाही… तर कायमच आपल्या ऋणात राहणं मला आवडेल.*

*स्नेहांकित*
*आ.सुधीर मुनगंटीवार🙏🙏🙏*