“दीक्षाभुमी” नागपूर भारतीय बौद्ध महासभा याच नावाने मालकी हक्काने भोगवटदार म्हणून ७/१२ वर व आखीव पत्रिका मध्ये नावाने करण्यासाठी लवकरच विनोद खोब्रागडे न्यायालयात खटला दाखल करणार आहे

28

 

सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी विधानसभेत सन १९६१ मध्येच दीक्षाभुमी नागपूर भारतीय बौद्ध महासभा याच नावाने १४एकर जागा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांना मागणी केली होती,व माननीय तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी दिनांक १५/०८/१९६१ ला दीक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध महासभा करीता लिज मंजूर करुन विभागीय आयुक्त नागपूर यांना निर्देश दिले होते .
मात्र तत्कालीन विभागीय आयुक्त नागपूर यांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले नाही, उल्लंघन केले,व भ्रष्टाचारी स्मारक समितीचे पदाधिकारी यांचे म्हणणे एकुण आजही ७० वर्षे झाले “दीक्षाभूमी” नागपूर हे नाव सरकारी रेकॉर्ड ७/१२ व आखीव पत्रिका मध्ये नाही,व तसा पुरावा कुणिही आजपर्यंत दिला नाही.

करोडो करोडो बौद्ध बांधव यांच्या विस्वासघात या स्मारक समितीचे पदाधिकारी यांनी व महसूल अधिकारी यांनी केला आहे .
तसेच “दीक्षाभुमी”नागपूर स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी व महसूलचे अधिकारी व भुमापन अधिकारी,दोन कंपनी, यांनी करोडो करोडो बौद्ध बांधवांचा विश्वासघात केल्यामुळे , बोगस सरकारी दस्तऐवज तयार करणे, मोठ्या प्रमाणात शासनाचा निधीचा गैर वापर करणे, “दीक्षाभूमी”नागपूर ला झुडपी जंगल ,सडक, रस्ते, इमारत पड,२०२० मध्ये दाखविले व आखीव पत्रिका मध्ये शेती सन २०१७ मध्ये दाखविले,व शासनाचा परिपत्रकाचा भंग करणे,फसवणूक करणे, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध फौजदारी खटला पुराव्यानिशी लवकरच एक दोन दिवसांत दाखल करणार आहे.????????????????????
*फिर्यादी -संघर्षी आयु.विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी/पटवारी वरोरा चंद्रपूर*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*