अखेर, चंद्रपूर जिल्ह्यातील, भद्रावती तालुक्यातील,बोगस कंपन्या मे.अरबिंदो कंपनी हैद्राबाद स्थीत मौजा बेलोरा व मे.कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनी बेंगलोर स्थित मौजा बरांज मोकासा यांच्या वर नोटीस इशु

45

 

*बोगस फेरफार बाबत चार आठवड्यात उत्तर मागीतले आहे*

*मा.SDM वरोरा यांनी बजावले नोटीस*
*विशेष म्हणजे या कंपन्या मध्ये सेवानिवृत्ती झालेले महसूल चे अधिकारी तहसीलदार,नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी सुद्धा बोगस कामे करत आहेत,त्यांचावर फौजदारी कारवाई करावी व पेंशन बंद करावे अशी मागणी विनोद खोब्रागडे यांनी केली आहे*
*संघर्षी विनोद खोब्रागडे व इतर यांनी दाखल केली होती अपील*
*सविस्तर असे की*

*चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मौजा बरांज मोकासा येथील KPCL कंपनी व महसूल अधिकारी, तसेच मौजा बेलोरा येथील में.अरबिंदो कंपनी व महसूल अधिकारी यांनी, कटकारस्थान करून, संगनमत करून, नियमबाह्य व बेकायदेशीर, एका दिवसात अनेक गावांतील, शेकडो शेतकऱ्याचा जमीनीचा बोगस फेरफार घेऊन एका दिवसात प्रमानीत केले होते,*
*असे फेरफार महाराष्ट्र व भारतात कुठेही केल्या जात नाही,मी स्वतः महसुल विभागात पटवारी, तलाठी असल्यामुळे अधिकार वाणीने लिहीत होतो व बोलत होतो*
*हे सर्व महसूल अधिकारी यांना माहिती असुनही ते सुध्दा या भ्रष्टाचारात सामील असल्याने सर्व अधिकारी मुंग गिळून ???????????? चुपचाप होते व आहेत*
*लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार,खासदार, सुद्धा चुपचाप होते व आहेत,कारण त्यांना या कंपन्या कडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोल बाॅंण्डचा माध्यमातून पैसा मिळाला आहे*

*अखेर ते सर्व बोगस फेरफार खारीज करन्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम २४७ नुसार अपील दाखल केली होती*
*अपीलार्थी विनोद खोब्रागडे तलाठी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर व इतर शेतकरी यांनी दाखल केली होती*
*विनोद खोब्रागडे यांनी खुद्द आर्गुमेंन्ट करून नोटीस इशु करा व उतरवादी यांना उत्तर सादर करन्यासाठी संधी द्यावे असे सांगितले*
*अखेर आज नोटीस इशु झाले असून दोन आठवड्यात उत्तर मागीतले आहे*
*समाजहितासाठी*
*देशहितासाठी*
*राष्ट्रबांधनीसाठी*
*समाजाने, शेतकऱ्यांनी,न्याय व हक्कासाठी २४तास जागृत राहावे धन्यवाद, जनहितार्थ जारी*

 

*अपीलार्थी*
*विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी वरोरा चंद्रपूर*