माननीय मंत्री महोदय सुधिरभाऊ मुनगंटीवार, महाराष्ट्र शासन , पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांनी,”महाजनसंपर्क “सभेत घेतली कुंसूबीच्या २४ आदिवासींच्या अन्याय अत्याचाराची दखल

51

* मंत्री महोदयांनि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना तात्काळ निर्देश देऊन वस्तुस्थिती दर्शक अहवाल मागितला*
*जेव्हा मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर हेच खोटे व बोगस “शपथपत्र” मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे कुंसूबीच्या आदिवासीनां मोबदला दिला असे खोटे व बोगस शपथपत्र उच्च न्यायालयात करून दिले,व कुंसूबीच्या आदिवासींची फसवणूक करतात,व न्यायालयाची सुद्धा दिशाभूल करतात??? तेव्हा त्यांचावर न्यायालय काय कारवाई करणार ? या कडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे????*
*खोटे व बोगस शपथपत्र करून दिले ही बाब माहीतीच्या अधिकारात माहिती उघड झाली आहे .*
*मंत्री महोदय यांंच्या समक्ष महाजनसंपर्क सभे मध्ये नियोजन भवन येथे दिनांक १/१२/२०२३ रोजी विनोद खोब्रागडे तलाठी व शिष्टमंडळ यांनी या प्रकरणातिल सर्व गौड़बंगाल उघड केले . जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची पोलखोल अनेक वेळा होऊनही त्यांनी धड़ा घेतलेला नाही ही शोकांतिका आहे ? *

*माननीय मंत्री श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार साहेब यांनी दिले जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निर्देश*
*सविस्तर वृत्त असे की*
*माननीय सांस्कृतिक मंत्री, तथा वन मंत्री, मत्स्यपालन मंत्री महाराष्ट्र शासन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार साहेब यांनी दिनांक १/१२/२०२३रोजी नियोजन भवन येथे जनता दरबार आयोजित केला होता.*
*विनोद खोब्रागडे तलाठी व कुंसूबीच्या आदिवासींनी गंभीर निवेदन दिले.*
*सभागृहात संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील व्यथित जनता आली होती, सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आले होते , सभागृह भरगच्च भरले होते, काही जनता मोठ्या प्रमाणात उभी होती*
*सुनावणी दरम्यान सुरुवातच विनोद खोब्रागडे तलाठी व आदिवासी यांच्या पासून झाली*
*विनोद खोब्रागडे यांना बघताच अनेक भ्रष्टाचारी अधिकारी यांना घाम फुटला,व काय बोलतो याकडे सभागृहाचे लक्ष लागले होते*
*विनोद खोब्रागडे यांनी शिष्टमंडळाला घेऊन माइक हातात घेऊन, सर्व प्रथम मंत्री महोदय यांना जनता दरबार आयोजित केल्याबद्दल धन्यवाद दिले, आणि विषय मांडायला सुरुवात करताच माननीय मंत्री महोदय यांनी माइक वर बोलू नका, जवळ येऊन विषय समजावून सांगा असे सांगितले*
*जर माइक वर विषय बोललो असतो,तर मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी खोटे बोगस शपथपत्र मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे कसे करुन दिले.व कुंसूबीच्या आदिवासींची फसवणूक कशी केली व आजही करत आहे,यांचा संपूर्ण पर्दाफाश जनता दरबार मध्ये जनतेच्या निदर्शनास आले असते.*
*तसेच चंद्रपूर शहरातील सरकारी जमीन घोटाळा, कर्नाटक पावर कार्पोरेशन कंपनी चां महाघोटाळा,साई वर्धा पावर कंपनी घोटाळा, उघडकीस सुद्धा आला असता.*
*मात्र मंत्री महोदय यांनी समय सूचकता, सदसद्विवेकबुद्धी वापरून मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना जनतेच्या नजरेतुन पडण्या पासून वाचविले,मात्र सुनावणी दरम्यान मंत्रिमहोदयांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना झापले.*
*विनोद खोब्रागडे यांनी दोनच प्रश्न विचारले*
*प्रश्न १) कुंसूबीचा आदिवासीनां ४२वर्षापासुन हक्क व मोबदला कां दिला नाही??????*
*प्रश्न २) माननीय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पत्रानुसार,व तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा पत्रानुसार, विनोद खोब्रागडे तलाठी यांनी फेरफार अदालत घेऊन सहा गावांतील गरीब लोकांना न्याय दिला,हे चुकीचे काम केले काय??????*
*एकाही प्रश्नाचे उत्तर मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा साहेब यांनी दिले नाही*
*तात्काळ माननीय मंत्री महोदय यांनी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना कुंसूबीचा आदिवासीनां तात्काळ न्याय व हक्क देण्यासाठी,व तलाठी विनोद खोब्रागडे यांच्या वर बेकायदेशीर कारवाई का केली याचे उत्तर तात्काळ देण्याचे निर्देश दिले*
*जेंव्हा मानीकगड सिमेंट कंपनी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात दिनांक २/२/२०२२ला लिहून दिले, कुंसूबीचा आदिवासीनां मोबदला दिला नाही, मात्र देण्यात येईल*
*मा.उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी सन २०२३मध्ये लिहून दिले, कुंसूबीचा आदिवासीनां मोबदला दिला नाही*
*तत्कालीन तहसीलदार जिवती यांनी सन २०१८मध्ये लिहुन दिले कुंसूबीचा आदिवासींना मोबदला दिला नाही*
*मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी यांनी दिनांक २४/९/२०२३ ला शासनाला अहवाल दिला, कुंसूबीचा आदिवासीनां १९८५मध्ये मोबदला दिला, मात्र रेकॉर्ड उपलब्ध नाही किती शोकांतिका आहे, खोटे बोलावे पण इतके खोटे व बोगस अहवाल जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कसे काय कंपनी च्या फेवर मध्ये दिले?????*
*दुसरीकडे सचिव मंत्रालय मुंबई यांनी बिना तारखेचे अनेक पत्र विनोद खोब्रागडे यांना दिले.*
*मा.विभागीय आयुक्त नागपूर हे सुद्धा बिना तारखेचे आदेश विनोद खोब्रागडे यांना दिले.*
*मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी अनेक पत्र बिना तारखेचे शासनाला दिले.व विनोद खोब्रागडे यांना दिले*
*मा.उपविभागीय अधिकारी राजुरा सनदी अधिकारी यांनी बिना तारखेचे आदेश, विनोद खोब्रागडे यांना दिले*
*चंद्रपूर चे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी बिना तारखेचे आदेश करुन सरकारी जमीनीची विल्हेवाट लावली*
*इतके सारे अधिकारी यांनी बिना तारखेचे आदेश केले, यांचावर काही कारवाई केली नाही.आणि शेतकऱ्यांनी बिना तारखेचे फक्त अर्ज तलाठी विनोद खोब्रागडे यांना दिले,ते अर्ज का घेतले म्हणून मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा महाघोटाळे उघडकीस विनोद खोब्रागडे यांनी काढले म्हणून कायद्याच्या बाहेर जाऊन बेकायदेशीर आदेश दिलेच कसे?????*
*मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कायद्याचे ज्ञान सुमार आहे, तसेच त्यांच्या निकालपत्राचा दर्जाही सुमार असल्यामुळे,जनहीताचा दृष्टीने एक मिनिट सुद्धा ते , त्या पदावर ठेवण्यास पात्र नाही,*
*आरोपी*-
*श्री.विनय गौडा जी.सी.जिल्हाधिकारी चंद्रपूर*
*जिल्हाधिकारी चंद्रपूर, आरोपी श्री.अजय अण्णासाहेब गुल्हाने तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर*
*आरोपी श्री अजित बाबुराव पवार तत्कालीन उपविभागीय अधिकारी चंद्रपूर*
*आरोपी श्री.प्रशांत सुभाष बेडसे तत्कालीन तहसीलदार जिवती/वरोरा चंद्रपूर.*
*आरोपी श्री.शांतनू गोयल, तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी चंद्रपूर*
*श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपूर*
*सह अनेक सनदी IAS अधिकारी विरुद्ध अट्रासिटीचा फौजदारी प्रकारणात आर्गुमेंन्ट झाले आहे*
*जनहितार्थ जारी*
*समाजहितासाठी*
*देशहितासाठी*
*राष्ट्रबांधनीसाठी*
*राज्य नियमावली व crpc कलम ३९पहा.*
*चंद्रपूर जिल्हा न्यायालय अंतर्गत बाब आहे*
*भारतीय संविधानातील अनुच्छेद १९नुसार बोलत आहे लिहीत आहे.*

*अपीलार्थी*
*आयु.विनोद खोब्रागडे तलाठी तथा जबाबदार जागृत नागरिक तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर*