ज्याअर्थी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी.सी.साहेब हे सुद्धा बोगस अहवाल महाराष्ट्र शासनाला देतात ??????

25

( साभार प्राप्त श्री विनोद खोब्रागडे दबंग पटवारी द्वारे )

*आज दिनांक 20/11/2023
रोजी
माहितीच्या अधिकारात माहिती उघड झाली*
*विनोद खोब्रागडे तलाठी महसूल विभाग वरोरा चंद्रपूर यांनीच आज घेतली माहितीच्या अधिकारात कायदेशीर माहिती.*
*यापूर्वी सुद्धा कायद्याचे भान न ठेवता दिनांक १८/११/२०२१ रोजी बोगस अहवाल मा.तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.अजय अण्णासाहेब गुल्हाने साहेब यांनी कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांना बोगस अहवाल दिले होते??????*
*आता विद्यमान जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी.सी.साहेब यांनी सुद्धा बोगस अहवाल मुख्य अवर सचिव महसूल मंत्रालय मुंबई यांना दिनांक 24/9/2023 ला पाठविले होते,हे आज माहीतीच्या अधिकारात हि माहिती उघड झाली.*
*ज्याअर्थी राष्ट्रीय संपत्तीची लुटमार करनारे, बिना तारखेचे बोगस अहवाल वरिष्ठांना देणारे,अशा सनदी IAS अधिकार्यांना शिक्षा कोण देणार??????* *महाराष्ट्र शासन हतबल आहे*.
*भारत सरकार हतबल आहे*
*न्यायालय सुद्धा हतबल आहे?????.*
*आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, मनमानीचे नाही,हे सनदी अधिकारी यांनी लक्षात ठेवावे*
*तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा चंद्रपूर यांचा रोखठोक शासनाला सवाल.*
*ज्याअर्थी आजही चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबीचा २४आदीवासी यांच्या नावाने भोगवटदार म्हणून ७/१२वर नावे आहेत.*
*मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.अजय अण्णासाहेब गुल्हाने यांनी आजच्या दिवशी दिनांक १८/११/२०२१मध्ये मानीकगड सिमेंट कंपनी मालक आहे असे बोगस अहवाल,कक्ष अधिकारी मंत्रालयात मुंबई महाराष्ट्र शासन यांना, माझ्या तक्रारीवर दिले आहे*
*असेच ४२वर्षापासुन कुंसूबीच्या आदिवासीं ची फसवणूक खुद्द जिल्हाधिकारी चंद्रपूर हेच करीत होते व आजही करत आहे.*
*एवढेच नाही तर, “बिना तारखेचे” अनेक बोगस अहवाल अपर मुख्य सचिव (महसूल) जागतिक व्यापार केंद्र मंत्रालय मुंबई यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी, माझ्या तक्रारीवर दिलेले आहे*
*एवढेच नाही तर तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.शांतनु गोयल यांनी “बिना तारखेचे”अनेक बोगस आदेश, माझ्या अपील प्रकरणात केलेले आहेत*
*एवढेच नाही तर मंत्रालयातील अनेक सचिव, यांनी सुद्धा “बिना तारखेचे”अनेक पत्र माझ्या तक्रारीवर मला पाठविले आहेत.*
*एवढेच नाही तर मा.विभागीय आयुक्त नागपूर हे सुध्दा” बिना तारखेचे” अनेक पत्र माझ्या प्रकरणात मला दिले आहेत.*
*म्हणजे सनदी IAS अधिकारी यांनी बिना तारखेचे अनेक पत्र दिले तरी यांचावर कुठलीच शिक्षा झाली नाही,*
*आणि दुसरी कडे, महाराष्ट्रात नाही तर भारतात गाजलेले तलाठी विनोद खोब्रागडे यांनी , महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार,फेरफार अदालत राजस्व अभियान मध्ये शेतकऱ्यांकडून अर्ज तलाठी विनोद खोब्रागडे यांनी घेतले, आणि वरिष्ठाकडे पाठविले, ते अर्ज निकाली काढने हे वरिष्ठ अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य होते व आहे.अभियान असल्याने काही अर्ज “बिना तारखेचे ” सुद्धा आले,या प्रकरणात शासनाचे एक रुपयांचे सुद्धा नुकसान झाले नाही, तरी मात्र जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बिना तारखेचे अर्ज का घेतले म्हणून, आकसबुद्धीने ,पक्षपात करून,भेदभाव करुन, व्यक्तीची प्रतिष्ठा व गरिमा मलीन करुन, कायद्याच्या बाहेर जाऊन, बेकायदेशीर कारवाई, संविधानीक पदावर बसुन असंविधानीक आदेश, मनुस्मृती च्या कायद्याप्रमाणे करुन शिक्षा दिली????,*
*मुळ कारण वेगळेच आहे,कारण तलाठी विनोद खोब्रागडे यांनी अनेक सनदी IAS अधिकारी, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे महाघोटाळे उघडकीस आणून, उच्च न्यायालय नागपूर येथे फौजदारी पीटिशन दाखल केले होते.नोटीस इश्यू झाले होते, त्यामुळे ते अधिकारी चिडून होते व आहेत,हे मुख्य कारण आहे.*
*वरिष्ठ सनदी IAS अधिकारी, रात्रीला बेकायदेशीर कामे करतात हे मी २७ वर्षांपासून नौकरी वर असतांना अनेक वेळा उघड्या डोळ्यांनी बघितले आहे, मात्र दिवसाढवळ्या बेकायदेशीर आदेश मनुस्मृती कायद्या प्रमाणे करनारे सुद्धा अनेक सनदी अधिकारी आहेत ????*
*जेव्हा मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर हे संविधानीक पदावर बसुन असंविधानीक मनूच्या कायद्याप्रमाणे, पक्षपात व भेदभाव करुन बोगस आदेश करतात तेव्हा त्यांचं करायचे काय??????*
*आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे,मनूचे किंवा मनमानीचे नाही????*
*अस्पृश्यता पाळणे भारतीय संविधानातील अनुच्छेद १७ नुसार दंडनीय गुन्हा आहे,व तो गुन्हा मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर व इतर अधिकारी यांनी केला आहे.*
*व्यक्तीची गरिमा,व प्रतिष्ठा मलीन करणे, पक्षपात व भेदभाव करणे हा सुद्धा गुन्हा आहे, आणि तो गुन्हा सुद्धा मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी केला आहे,*
*मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर व इतर सहा अधिकारी यांचा विरुद्ध थेट राष्ट्रीय मानव अधिकार आयोग नवी दिल्ली,व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली यांचा कडे पुराव्यासह गंभीर तक्रार दाखल केली आहे.*
*तक्रारदार खुद्द तलाठी विनोद खोब्रागडे महसूल विभाग वरोरा चंद्रपूर हेच आहेत.*
*संविधानीक पदावर बसुन, मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर हे असंविधानीक कामे कायद्याच्या बाहेर जाऊन, पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन, पक्षपात व भेदभाव करुन, नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन न करता, नियमबाह्य व बेकायदेशीर कामे करुन, काल्पनिक बोगस अहवाल वरिष्ठांना देऊन, अनुसूचित जातीचे फिर्यादी (बौद्ध) तसेच अनुसूचित जमातीचे (कुंसूबीचे आदिवासी) यांच्या वर अन्याय अत्याचार करुन, व्यक्तीची गरिमा व प्रतिष्ठा या अज्ञानी अधिकार्यांनी मलीन केली आहे.*
*यांचे कायद्याचे ज्ञान सुमार असल्यामुळे, तसेच त्यांच्या निकाल पत्राचा दर्जाही सुमार असल्यामुळे, जनहिताच्या द्रुष्टीने ते एक मिनिट सुद्धा त्या महत्वाचा पदावर ठेवण्यास पात्र नाही.(लायक नाही), पक्षपात करणे हा भारतीय संविधानातील अनुच्छेद १७ नुसार दंडनीय गुन्हा आहे.*
*या अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करून, मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीचे लुटमार करुनही सरकार यांच्या वर कारवाई करण्यास असमर्थ ठरली आहे.मेहरबान आहे*
*म्हणूनच भारतीय संविधानातील अनुच्छेद ३३८,३३८क, नुसार मा.जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी माननीय राष्ट्रीय मानव अधिकार आयोग नवी दिल्ली, तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली, यांच्या कडे आरोपी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर व इतर सहा अधिकारी यांची गंभीर तक्रार पुराव्यासह केली आहे.*
*जर माननीय आयोग यांनी सात दिवसात अँक्शन घेतली नाही,तर मात्र मी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे, अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी पीटिशन दाखल करणार आहे.*
*तसेच भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२नुसार माननीय सुप्रीम न्यायालय दिल्ली येथे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन या मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर व इतर अधिकारी यांनी केल्यामुळे फौजदारी याचिका दाखल करणार आहे,यांची नोंद घ्यावी*
*प्रथम माननीय राष्ट्रीय मानव अधिकार आयोग,व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांनी एक्शन घ्यावी, करीता गंभीर तक्रार तात्काळ स्पिड पोस्टाने पुराव्यासह दिली आहे.*
*ये तो सब झाकी है,पुरा पिक्चर तो अभी बाकी है.*
*एक लक्षात घ्या, आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे,मनुचे किंवा मनमानीचे नाही,हे वरिष्ठ सनदी IAS अधिकारी व मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी लक्षात ठेवावे.*
*आरोपी अधिकारी यांच्या नावासह दिलेली गंभीर तक्रार पाठवित आहे*
*जनहितार्थ जारी*
*समाजहितासाठी*
*देशहितासाठी*
*राष्ट्रबांधनीसाठी*
*समाजाने २४तास जागृत राहावे*
*राज्य नियमावली व crpcकलम ३९ पहा.*
*चंद्रपूर जिल्हा अंतर्गत बाब आहे*
*भारतीय संविधानातील अनुच्छेद १९नुसार अधिकार वाणीने लिहीत आहे.*
*मा.आणि माननीय.या दोन शब्दात मध्ये फरक आहे.*
*अन्याय करना-यापेक्षा अन्याय सहन करनारे जास्त गुन्हेगार आहेत, म्हणून अन्याय सहन करु नका*
*जनहितार्थ जारी*

*तक्रारदार/अपीलार्थी*
*आयु.विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर.*
*मो.९८५०३८२४२६*