शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम तिघाडी सरकार करीत आहे* *विजय वडेट्टीवार*. *(मोर्चात २५०० चे वर शेतकरी उपस्थित)

51

(श्री गुरु गुरनुले यांच्याकडुन साभार प्राप्त )
मुल – वाघाच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाला असून रानटी डुकराच्या व वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेती नष्ट झाली आहे. तरी नुकसान भरपाईचा पत्ता नाही. वर्तमान स्थितीत शेती कोणी करणार नाही. व धान उत्पादक शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले नाही. परंतु उद्योगपतींचे 7 हजार कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला पैसे नाही. म्हणून आता संतोष रावत यांचे पाठीमागे राहून कांग्रेसला निवडून दिले पाहिजे असे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते *माननीय विजय भाऊ वडेट्टीवार* यांनी हजारो शेतकऱ्यांसमोर केले. याप्रसंगी सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष *माननीय संतोषभाऊ‌ रावत* यांनाही शेतकऱ्यांच्या समस्या, नजुल व वनहक्क धारकांना जमिनीचे पट्टे दिल्या गेले नाही. हे मार्गी लावण्याचे नाम.विजुभाऊ मार्गी लावतील परंतु आपण हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जाण्याची तयारी आपण ठेवावे असे मार्गदर्शन केले. उपस्थित युवा नेत्या शिवानी ताई वडेट्टीवार यांनी या क्षेत्रात शेतकऱ्यांची अवदशा होणे ही शोकांतिका असल्याचे मत व्यक्त केले. मोर्चात तालुक्यातील २५०० च्या वर दुष्काळ ग्रस्त शेतकरी व महिला उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत नाम.मुख्यमंत्री ,नाम.उपमुख्यमंत्री , नाम.पालकमंत्री यांना निवेदन उपविभागीय अधिकारी श्री.मेश्राम,तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांना नाम.विजय वडेट्टीवार व संतोषसिंह रावत यांचे हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी , वन परिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले. मंचावर सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार,माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर, शिवा राव, माजी जिल्हा महिला अध्यक्ष चित्रा डांगे, माजी कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,ओबीसी सचिव गुरुदास चौधरी,दीपक वाढई यांचेसह महिला अध्यक्षा,युवक अध्यक्ष,व तालुका शहर पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चाच्या आयोजनासाठी बजार समितीचे सर्व संचालक, तालुक्यातील सर्व सरपंच, कांग्रेस पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले.