गांधी चौक चंद्रपुर येथे मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती भीष्म मॅडम च्या हस्ते वॉक फ़ॉर फ्रीडम रॅली चे उदघाटन सम्पन्न

34

( श्री ऍड महेंद्र असरेट यांच्याकडुन साभार प्राप्त )

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर आणी व्हिजन रेस्क्यू तर्फे दी.14 आक्टोबर 23 ला मानव तस्करी विरोधात जाणसामान्यात प्रभोधन करण्याकरिता वॉक फॉर फ्रीडम रॅली चे आयोजन करण्यात आले. गांधी चौक येथे संपन्न झालेल्या या रॅली चे उदघाटन मा. प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती भीष्म मॅडम यांनी करून मानव तस्करी विरोधात शपथ दिली. प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मा. कुलकर्णी साहेब, जिल्हा न्यायाधीश मा. प्रशांत काळे साहेब जिल्हा बार अशोसीएशन चे अध्यक्ष ऍड पाचपोर होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मा. सुमित जोशी यांनी मानव तस्करी रोखण्याकरिता लोकांची जबाबदारी व या रॅली च्या आयोजित करण्यामागची भूमिका प्रस्ताविकात विशध केली.सदर रॅली गांधी चौकातून जटपुरागेट मार्गे परत गांधी चौकात समारोप करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन शाम हेडाऊ यांनी तर आभार भूषण तोंडरे यांनी मानले.कार्यक्रमात अनेक महाविद्यालयाचे विध्यार्थी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ऍड महेंद्र असरेट,इको प्रो चे बंडू धोत्रे,धनंजय तावाडे,प्रा. बोरकुटे सर, प्रा.मनुरे, प्रा. बारसागडे, पद्माकर सोनकुसरे तसेच व्हिजन रेस्क्यू चे सदस्यांनी परिश्रम घेतले.