गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चारखासंघ मुल येथून निघणार जनसंवाद पदयात्रा

25

*(श्री गुरु गुरनुले यांच्या कडून साभार प्राप्त)*

मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात *३ ते १२ सप्टेंबर २०२३* या कालावधीत देशाचे जन नायक खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर *जनसंवाद* यात्रा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने विधान सभेचे विरोधी पक्षनेते व माजी मंत्री मा.आमदार.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी दिलेल्या आदेशानुसार मुल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे पदयात्रेचा शुभारंभ काँग्रेस नेते सी. डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प. अध्यक्ष *मान. संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात व शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाग विदर्भ चारखासंघ मुल ईथुन * आज ३ सप्टेंबर २०२३* *रोजी सकाळी ६-०० वाजता* निघणार आहे.
पदयात्रेच्या माध्यमातून मुल तालुक्यातील जनतेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा काँग्रेसचा संकल्प असून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अन्याय, अत्याचार व शेतकऱ्यांचा दुष्काळ, लोकशाहीची हत्या अशा अन्य समस्यांवर प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधून जनभावना जाणून घेणे या पदयात्रेचा उद्देश आहे.
ही पदयात्रा तालुक्यातील सर्व गावांना यात्रेच्या माध्यमातून भेटी देऊन संवाद साधणार आहे.करीता तालुक्यातील काँग्रेसच्या युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस, शहर काँग्रेस,महिला काँग्रेस,महिला शहर कांग्रेस, ओबीसी सेल काँग्रेस, किसान सेल काँग्रेस, एन. टी .काँग्रेस सेल, सेवादल काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहावे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,उपसभापती व समस्त संचालक, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष,संचालक, आदर्श खरेदी विक्री सह.सोसायटीचे पदाधिकारी व संचालक, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालक आणि काँग्रेस समर्पित ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य यांनीही बहु संख्येनी यात्रेत आवर्जून सहभागी व्हावे. अशी विनंती तालुका कांग्रेस कमिटी मधील सर्व फ्रंटल सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.