*( श्री दीपक कटकोजवार यांजकडून साभार प्राप्त )*
*चंद्रपूर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येत असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील खापरी या सर्वात मोठ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्राम पंचायत कार्यालयात १५ ऑगस्ट २०२३ला भारतीय स्वातंत्र्य दिनी सामाजिक क्षेत्रातील कार्यरत अग्रेसर जेष्ठ महिला नेत्या सौ.मंगलाताई अनंतराव कटकोजवार यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले आले तसेच विर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला मालार्पण करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या फलकाला यावेळी पुष्पहाराने व तिरंगी फुगे लाऊन सुशोभित करण्यात आले होते.*
*या राष्ट्रीय कार्यक्रमास प्रामुख्याने सरपंच,उपसरपंच,
ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य-सदस्या,प्रतिष्ठित नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.*