राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त तालुका कांग्रेस कमिटी मुल तर्फे विनम्र अभिवादन* *महिला शहर अध्यक्ष,सचिव यांचे स्वागत

44

 

*आधुनिक युगातील तंत्रज्ञानाचे जनक, युग प्रवर्तक माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी दिना निमित्य मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार , तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, राजू पाटील मारकवार, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार,शहर अध्यक्ष नलिनी आडपवार यांचेहस्ते स्व.राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार ,शहर अध्यक्ष सुनील शेरकी, महिला शहर अध्यक्षा नलिनी आडपवार यांनी गांधी घराण्याच्या बलिदाना बाबत व काँग्रेस पक्ष त्यागाबाबत सविस्तर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी सरपंच विनोद कामडी, बाजार समिती संचालक राहुल मुरकुटे, व्हॉईस आफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार संजय पडोळे, काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष रूमदेव गोहने, माजी नगरसेवक विनोद कामडे, माजी नगर सेविका ललिता फुलझेले, संदीप वाढई, मल्लेश यारेवार, महिला काँग्रेसच्या सचिव शामला बेलसरे, पपिता टिंगुसले, सीमा भसारकर, वर्षा टिंगुसले, उमा बेलसरे, निता टिंगुसले, यांचेसह कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून स्व.राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.*
*याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्षा नलिनी आडपवार व सचिव शामला बेलसरे व महिला सदस्या यांचे तालुका कांग्रेस कमिटीचे वतीने सभापती राकेश रत्नावार ,उपसभापती राजेंद्र कन्नमवार, राजू पाटील मारकवार यांनी गुलाब पुष्प व कांग्रेस दुपट्टा देऊन स्वागत व अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष, माजी नगरसेवक ,व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष गुरु गुरनुले, यांनी केले तर आभार सुरेश फुलझेले यांनी मानले.*