*( दुसऱ्या काँग्रेसने विरोध केला नसता तर अविरोध येऊन राज्यात इतिहास घडला असता – संतोष सिंह रावत)*
*( श्री गुरु गुरनुले यांच्याकडून साभार प्राप्त )*
*मूल – शेतकऱ्यांसाठी नेहमी झटणाऱ्या व ग्रामीण राजकारणाचे केंद्र स्थान म्हणून ओडखल्या जानाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती मूलच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत खऱ्या काॅंग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीने दुसऱ्या गटाच्या काँग्रेस संम्बोधनाऱ्या आघाडीने विरोध केला नसता तर सर्व उमेदवार अविरोध निवडून आणून राज्यात इतिहास घडला असता अश्या प्रतिक्रिया खंबीर नेतृत्व करणारे सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केल्या. काँग्रेसने बहुमताने विजय प्राप्त केल्याने परत कृषी उत्पन्न बाजार समितीवर संतोषसिंह रावत यांनी शेतकरी विकास आघाडीच्या रूपाने बहुमताने वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालका पैकी हमाल तोलारी मतदार संघात रमेश बरडे अविरोध निर्वाचित झाल्याने काल सतरा संचालक पदांसाठी गुप्त मतदान पार पडले. अकरा संचालक निवडुन दयावयाच्या सेवा सहकारी संस्था मतदार संघात सतरा उमेदवारांनी नशीब अजमावले. या मतदार संघाच्या सर्वसाधारण गटात काॅंग्रेसच्या संतोषशिन्ह रावत गटाचे बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार यांचेसह माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, अखील गांगरेड्डीवार आणि किशोर घडसे यांनी पुन्हा संचालक पदाची खुर्ची बळकावली आहे. या गटात रावत गटाचे सुनिल गुज्जनवार आणि हसन वाढई असे एकुण सातही संचालक निर्वाचित झाले आहे. या गटात खासदार समर्थक गटाचे किरण पोरेड्डीवार, सुधाकर बांबोळे आणि पराग वाढई दारुण पराभव झाला. सेवा सहकारी संस्थेच्या महिला राखीव गटात काॅंग्रेसच्या संतोष रावत गटाच्या चंदाताई कामडी आणि उषाताई शेरकी विजयी झाल्या, खासदार समर्थक गटाच्या वनिता हरडे पराभुत झाल्या, इमाव गटातून काॅंग्रेसच्या रावत गटाचे सुमीत आरेकर यांनी खासदार समर्थक गटाचे नरेंद्र चैधरी यांचा पराभव केला तर विजाभज राखीव गटात बाजार समितीचे माजी उपसभापती रावत गटाचे संदीप कारमवार यांनी खासदार व माजी आमदार व माजी जी.प. अध्यक्ष समर्थक गटाचे पंकज पुल्लावार यांचा दणदणीत पराभव केला. चार संचालक निवडून द्यावयाच्या ग्राम पंचायत मतदार संघात दोन संचालक निवडून द्यावयाच्या सर्वसाधारण गटात काॅंग्रेसच्या रावत गटाचे लहू कडस्कर, राहुल मुरकुटे यांनी बाजी मारली असून त्यांनी खासदार समर्थक गटाचे राकेश दहीकर आणि भाजप विचाराचे स्वतंत्र उमेदवार रंजीत समर्थ यांचा पराभव केला आहे. अनुसूचित जाती जमाती गटातून रावत गटाच्या शेतकरी विकास आघाडीचे शालीक दहीवले यांनी खासदार समर्थक गटाचे अरविंद वनकर आणि भाजप विचाराचे स्वतंत्र उमेदवार माजी संचालक राहिलेले प्रशांत बांबोळे यांचा तर आर्थिक दृष्टया दुर्बल गटातून काॅंग्रेसच्या रावत गटाचे जालींदर बांगडे यांनी खासदार समर्थक गटाचे भुपेश दुर्गे यांना पराभवाची धुळ चारली आहे. दोन संचालक निवडून दयावयाच्या व्यापारी अडते मतदार संघात तुलाराम घोगरे व अमोल बच्चुवार या व्यापारी गटात सिंकदर ठरले आहे. या गटात कासु वेंकन्ना साईलु आणि सुधाकर मोहुर्ले पराभूत झाले. या गटात काॅंग्रेसच्या रावत गटाच्या शेतकरी विकास आघाडीने अडते तुलाराम घोगरे आणि सुधाकर मोहुर्ले यांना पाठींबा दिला होता. अठरा संचालकीय मूल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्यें काॅंग्रेसच्या विजय वडेट्टीवार व संतोष रावत गटाने बहुमतात विजय मिळवत समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. मपार पडलेली बाजार समितीची निवडणुक भाजप विरूध्द काॅंग्रेस अशी रंगेल अशी चर्चा होती परंतू ऐनवेळेवर भाजपा समर्थक उमेदवारांनी निवडणुक रिंगणातून माघार घेतल्याने पार पडलेली निवडणुक काॅंग्रेसच्या दोन गटात झाली. समितीवर वर्चस्व प्रस्थापीत केलेल्या काॅंग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीने यावर्षी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शनात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे नेतृत्वात गड लढविला तर काॅंग्रेसच्या शेतकरी महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे माजी आमदार देवराव भांडेकर, जि.प.चे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार आणि जि.प.चे माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर यांना खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी छुपा पाठींबा दिला होता. त्यामूळे झालेल्या बाजार समिती निवडणुकीत काॅंग्रेस विरूध्द काॅंग्रेस उभी केल्याने सुज्ञ मतदारांनी मात्र खरी काँग्रेस ओळखून विरोधकांना धूळ चारली. विजई उमेदवारांनी मिरवणूक काढून काँग्रेस भवन येथे विजई उमेदवारांचे अभिनंदन करीत उमेदवार राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर,राजेंद्र कन्नमवार,संदीप कारमवार,चंदा कामडी यांनी मनोगत व्यक्त केले.संचालन शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी केले तर मतदारांचे व सहकार्य करणाऱ्या शुभचिंतकांचे जाहीर आभार कमिटीचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी मानले.*