✍️डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 10,20,30,चा फार्मुला सांगीतला होता,म्हणजे नेमके काय.?????

55

*( श्री विनोद खोब्रागडे यांच्या कडून साभार प्राप्त)*

*✍️डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याकाळी 10 वकील,20 डॉक्टर,30 इंजिनिअर,असले तरी समाजाचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत,असे सांगितले होते.नंतर खूप काही अनुयायी शिकले,डॉक्टर,वकील,इंजिनिअर झाले पण काही कामाचे झाले नाही.अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लिहावे लागले,मुझे लिखे पढे लोंगोनेही धोका दिया। मी जेव्हा अंबाझरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बुलडोझर लावून पाडले त्या समंधात चार महिन्यापुर्वी पोष्ट टाकली,महाराष्ट्रातुन तेव्हापासून आजपर्यंत शेकडो वकील मंडळीचे फोन आले,साहेब पीटीशनची प्रत पाठवा आम्ही ही आम्हचा एरियात गुन्हे दाखल करतो म्हणून,अनेक वकील मंडळी आंदोलन स्थळी नागपूरला भेट दिले,फोटो काढले,फेसबुकवर ,सोशलमीडीयावर टाकले ,पुढे काहीही केले नाही.कमीत कमी मी दाखल केलेल्या पीटीशन मध्ये वकील पत्र दाखल करा म्हणून मी बौद्ध अनुयायी,असलेल्या वकिल मंडळीना आव्हान केले आहे, की,अंबाझरी नागपूर येथील 20 एकरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बुलडोझर लावून,शासन,प्रशासन,व मेसर्स गरुडा कंपनीने काही दिवसापुर्वी बेकायदेशीर पाडलेले आहे.*
*लाँ पाईन्ट 1)अंबाझरी तलाव असतांना,संपूर्ण जागेवर बगीचा दाखविण्यात आले आहे.*
*2)ज्या दिवशी फेरफार घेऊन नोटीस दिली,त्याच दिवशी फेरफार पास केले आहे.*
*3)एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बुलडोझर लावून पाडले.आणि दुसरीकडे त्याच जागेमध्ये बाजूला स्वामी विवेकानंद यांचे स्मारक तयार केले आहे.*
*हा पक्षपात,भेदभाव शासन कसे काय करु शकते.?????????*
*नागपूर अंबाझरी परिसरात आंबेडकरी अनुयायी 100 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे.*
*मात्र एकानेही फौजदारी पीटीशन कुठल्याही न्यायालयात दाखल केली नाही.ही शोकांतिका आहे.*
*कारण त्यांना त्या प्रकरणाचे राजकारण करायचे आहे.*
*मी हे सर्व पाहून,व्यथित झालो,आणि आंदोलन कर्ते यांना समजावून सांगितले की फौजदारी पीटीशन दाखल करा,असे दिनांक 25/1/2023 रोजीच सांगितले,पण ते तेव्हाही ऐकले नाही.व आजही ऐकले नाही.कारण त्यांचा हेतू काय आहे,समजन्या पलीकडे आहे.*
*नंतर मी संपूर्ण दस्तऐवज पुरावे घेऊन वरोरा तालुक्यातील,चंद्रपूर जिल्ह्यातील,*
*जिल्हा व सत्र न्यायालयात, फौजदारी पीटीशन दाखल केलो.*
*प्रथम पोलिस प्रशासनाला रिपोर्ट दिली,त्यांनी कारवाई केली नाही,नंतर माननीय कोर्ट विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांचा न्यायालयात पीटीशन दाखल केली,त्यांनी अँट्रासिटीचा कलमा अंतर्गत फौजदारी पीटीशन दाखल असल्याने,न्यायालयाने मला अधिकार नाही म्हणून दोन दिवसात आदेश केला.*
*नंतर माननीय विषेश जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे पीटीशन दाखल केलो.आणि स्वतःच आर्गुमेंन्ट केलो.नोटीस इश्यू झाले.*
*आरोपी विभागीय आयुक्त नागपूर,जिल्हाधिकारी नागपूर,उप आयुक्त महानगरपालिका नागपूर,उपविभागीय अधिकारी नागपूर,तहसीलदार नागपूर,मंडळ अधिकारी नागपूर हे आरोपी म्हणून न्यायालयात खाजगी वकिल मंडळी घेऊन हजर झाले,आणि त्याच दिवशी त्या न्यायमूर्तीची बदली केली,अवघे एक वर्षाच्या आत,त्यांना माझ्या विषयाचा संपूर्ण अभ्यास झाला होता.*
*आरोपी असेलेले मे.गरुडा कंपनीचे चालक,मालक, मंत्री,सचिव मंत्रालय मुंबई,व तलाठी,हे हजर झाले नाही.त्यांना पुन्हा नोटीस काढा असे डायरेक्शन दिले.त्याच वेळी त्या न्यायमूर्ती यांची बदली केली,व दुसरे न्यायमूर्ती आले,दिनांक 13/4/2023 ला सुनावणी होती.आता दिनांक 27/4/2023 ला सुनावणी आहे.*
*त्यापुर्वीच दिनांक 12/4/2023 ला गरुड कंपनीने सदर जागेचे सकाळी भुमीपुजन करुन टाकले.*
*सध्या मी एकटाच सदर फौजदारी केस नंबर 3/2023 ही लढत आहे,संघर्ष करत आहे,आणि करणार आहे,तसाही मी एकटाच करोडोला लय भारी आहे,.* *समाजहीतासाठी न्यायालयीन लढाई अनेक समाजाचा मी लढत आहे,संघर्ष करीत आहे.*
*पण जेंव्हा अनेक वकील मंडळी यांनी मला अंबाझरी प्रकरणात पीटीशन मागीतले व मी दिले,म्हणून त्या बौद्ध समाजातील वकील मंडळी सदर फौजदारी केस नंबर 3/2023 मध्ये जर अनेक वकिल पत्र स्वतःहुन दाखल केले.तर लवकर न्याय मिळायला वेळ लागणार नाही.*
*म्हणून माझी वरोरा तालुक्यातील वकील मंडळी,चंद्रपूर जिल्ह्यातील,नागपूर जिल्ह्यातील,महाराष्ट्रातील,वकिल मंडळी यांना आव्हान आहे की आपण माझ्या फौजदारी पीटीशन नंबर 3/2023 मध्ये वकील पत्र दाखल करावे.असे आव्हान करीत आहे.*
*हे काम ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बेकायदेशीर पाडल्या संबंधात असल्याने व ते समाज हिताचे असल्याने, स्वतःहुन पुढे यावे ,याची फी आपणाला मिळणार नाही.*
*समाजहीतासाठी.पुढे या.*आले तर स्वागत आहे.नाही आले तर मी सक्षम आहेच.*
*धन्यवाद.??*
*न्याय व हक्क मागुन मिळत नाही,तर न्यायालयातुन मिळवून घ्यावे लागते.*

*अपीलार्थी.*
*जबाबदार व जागृत नागरीक,कायद्याचा अभ्यासक,दबंग तलाठी महसूल विभाग चंद्रपूर.आयु.विनोदभाऊ खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर*
*मो.9850382426.*