52

*✍️फौजदारी प्रकरणात आरोपी असलेले तत्कालीन तहसीलदार वरोरा रोशन मकवाने,हल्ली कळमेश्वर तालुका जिल्हा नागपूर येथे कार्यरत व ठानेदार वरोरा,यांच्या विरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यातच चोरीचा गुन्हा दाखल करण्यास रिपोर्ट दाखल. चौकशीत असलेली विनोदभाऊ खोब्रागडे यांची वैयक्तिक माहिती ठाणेदारांनीच चोरून आरोपी तहसीलदार मकवाने वरोरा यांना दिलीच कशी.????? तात्काळ, चोरीचा गुन्हा दाखल करण्यास रिपोर्ट दाखल झाली आहे.*
*दाखल करनारा खुद्द कायद्याचा अभ्यासक,जबाबदार व जागृत नागरिक दबंग तलाठी विनोदभाऊ खोब्रागडे हेच आहे.*

*या आरोपी तहसीलदार रोशन मकवाने यांच्यावर जे आरोप फिर्यादी तलाठी विनोदभाऊ खोब्रागडे यांनी लावले,*
*ज्यामध्ये तहसीलदार मकवाने यांनी मौजा फत्तापुर येथील सरकारी 125 एकर जागेपैकी पक्षकार ठेकेदार यांनी 2 एकर जागा मागीतली,आणि या मकवाने तहसीलदार यांनी बिना साक्षरीने 5 एकर जागा दिली.व त्या ठेकेदाराने 125 एकर जागेत बिनधास्त अवैध उत्खनन केले,हा महाघोटाळा उघडकीस आनलो,व पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.त्यानंतर याच तहसीलदार मकवाने यांनी दिनांक 26/11/2021 रोजी संविधान दिवशीच सकाळी 8.10 वाजता तहसील कार्यालयत बोलावून,असंविधानीक कामे करुन,प्रतिष्ठा मलीन केली,त्या संबंधात अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यास शासन,प्रशासन,यांना तक्रार केली,म्हनुनच माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांनी चौकशी करुन अहवाल सादर करा असे,माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र दिले.व त्यानी माननीय उपविभागीय अधिकारी वरोरा यांना पत्र दिले.व त्यांनी तहसीलदार मकवाने यांना नोटीस देऊन या आरोपावर अहवाल सादर करा असे कळविले.*
*माननीय उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार मकवाने यांना नोटीस दिले व हजर होऊन उत्तर दाखल करण्यास सांगितले.*
*मात्र तहसीलदार मकवाने हजर झाले नाही व वस्तुनिष्ठ आरोपावर उतर न देता.बोगस उत्तर उडवाउडवीची दिले.*
*एवढेच नव्हे तर फिर्यादी यांनी जागृत नागरिक म्हणून जे तक्रारी पोलीस ठान्यात दिले, सन 2016 पासून 2023 पर्यंत ज्या तक्रारी पोलीस ठान्यात खाजगी कंपन्या,व महसूलचे अधिकारी विरुद्ध ,व ईतरानी जे सार्वजनिक राष्ट्रीय संम्पतीचे हजारो करोड रुपयांचे नुकसान* *केले,त्यांच्या विरूद्ध फौजदारी तक्रारी दिले,अनेक तक्रारीवर पोलिसांनी सुध्दा कारवाई केली नाही,ते सुद्धा महाघोटाळ्यात सामील होते,म्हणून CRPC कलम 156(3) नुसार न्यायालयातुन FIR दाखल केलो.अनेक प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे,चौकशी सुरू आहे, असे असतानां माहिती देता येत नाही,खुद्द ठाणेदार वरोरा यांनीच माझी स्वतःचा तक्रारीवर काय कारवाई केली त्यावर माहिती मागीतली असता दिनांक 6/3/2023 ला माहिती कलम 8(1)(ज) नुसार देता येत नाही असे उतर दिले आहे,मग माझी वैयक्तिक माहिती आरोपी मकवाने यांना ठाणेदारांनीच दिलीच कशी.*
*मकवाने तहसीलदार यांनी मुळ प्रकरण विचलित करण्यासाठी,व पळपुटेपणा करण्यासाठी ,वरिष्ठांना बोगस माहिती देण्यासाठी, ठाणेदार वरोरा यांचाशी कटकारस्थान ,व संगणमत करुन,नागपूर-अंबाझरी प्रकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बेकायदेशीर गरुड कंपनी व महसूल अधिकारी यांनी पाडले त्या संबंधात कोर्टाने नोटीस इश्यु केले आहे ही माहिती दिली,तसेच,भिमाकोरेगाव प्रकरणात बोगस 7/12 दाखवून विजयस्तंभाकडे अशी नोंद घेतली त्यासमंधात रिपोर्ट दिली,लाँड बुद्धा टि.वी.प्रकरण जनतेचे व माझे पैसे बुडविले त्या संबंधात रिपोर्ट दिली,स्वाध्वी प्रज्ञासिंग प्रकरण हेमंत करकरे विरुद्ध अपशब्द बोलले त्या संबंधात रिपोर्ट दिली,संविधान दिल्लीत जाळल्याबद्दल रिपोर्ट दिली,याच्या व्यतिरिक्त नामपल्लीवार वि.मयूर प्रकरण ज्याचा काहीही फिर्यादीचा संबंध नाही,अशी बोगस माहिती चोरून पोलिसांनी तहसीलदार मकवाने यांना दिलीच कशी,व तिने वरिष्ठांना दिलीच कशी.????????*
*फिर्यादीची व्यक्तीगत माहिती ,फिर्यादीला म्हणजे विनोदभाऊ खोब्रागडे यांना न विचारता चोरुन माहिती तहसीलदार मकवाने यांना ठाणेदार वरोरा यांनी दिलीच कशी.???????*
*ज्याअर्थी माननीय सुप्रीम न्यायालयाचे सर न्यायमुती खेअर साहेब,व न्यायमूर्ती चंद्रचुड साहेब,यांचा 9 न्यायमूर्तीच्या संविधान पिठाने,तसेच मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती श्रीमती वंसती नाईक यांनी महत्त्वपुर्ण जजमेंट दिले कि वैयक्तिक माहिती देऊ नका.तरीही आरोपी तहसीलदार मकवाने यांना चोरून माहिती दिली कशी.?????*
*तहसीलदार वरोरा आणी ठाणेदार वरोरा दोघावरही चोरीचा गुन्हा दाखल करा म्हणून वरोरा पोलिस ठाण्यात रिपोर्ट दिली आहे.व वरिष्ठ पोलिस अधिकारी व महसूल अधिकारी यांनाही तक्रारीची प्रत दिली आहे,24 तासात कारवाई करावी,अशीच माहिती यापुर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.अजय गुल्हाने साहेब यांनी माननीय राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यानां दिनांक 13/10/2022 रोजी,विनोद खोब्रागडे हे माहीतीचा अधिकारात अनेक माहिती मागतो,आणि पत्रकार परिषद घेऊन महाघोटाळे उघडकीस करतो, असे चित्र निर्माण केले होते,व विद्यमान जिल्हाधिकारी चंद्रपूर यानीही असाच प्रकार आयोगाकडे केला होता,आयोगाने सुनावले तो जबाबदार व जागृत नागरिक आहे,जल,जंगल,जमीन,ही राष्ट्रीय संपत्ती आहे,आणि ते वाचवण्यासाठी भारतीय संविधानातील अनुच्छेद 51क.झ.नुसार नागरिकांचे कर्तव्यच आहे आणि तेच काम विनोद खोब्रागडे 28 वर्षांपासून करत आहे, , .*
*एक लक्षात घ्या.भ्रष्टाचार महसूल अधिकारी करायचे.कुंसुबीचे आदिवासीचे गाव अधिकारी बेकायदेशीर विकायचे,चंद्रपूर शहरातील सरकारी जमीनी अधिकारी बेकायदेशीर विकायचे,आणि तेच बेकायदेशीर कारवाई करायचे.आणि यांचे महाघोटाळे तलाठी विनोद खोब्रागडे यांनी काढले तर बोगस माहिती शासन,प्रशासन,व जनतेला देतात.??????*
*अधिकारी यांचात दम असेल,हिम्मत असेल तर त्यांनी कोर्टात माझ्या विरुद्ध दावे दाखल करावे.अडवल कुणी.???????*
*एक लक्षात घ्या मी पुराव्यानिशी बोलत असतो.*
*आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे.मनमानीचे नाही.*
*अन्याय,अत्याचार,सहन करणे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकविले नाही.*
*म्हणून तहसीलदार असो, जिल्हाधिकारी असो,कमिश्नर असो,कि सचिव असो,कि लोकप्रतिनिधी असो.की पोलीस अधिकारी असो ,जो गुन्हा करेल,त्यांना शिक्षा व दंड झालेच पाहिजे.कायद्यापेक्षा कुणिही मोठा नाही,हे लक्षात घ्यावे.*
*आणि अपराध हा अपराध होतो भादवी कलम 40 नुसार तसेच चोरी ही चोरीच असते,म्हणून चोराला चोर म्हटलेच पाहिजे.????*
*समाजहीतासाठी.*
*देशहितासाठी.*
*राष्ट्रहीतासाठी.*
*जनहितासाठी.जागृत नागरिकांनी,न डगमगता निर्भयपणे भ्रष्टाचार उघडकीस आणावेत.*
जनहितार्थ जारी.
*फिर्यादी*
*जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचा अभ्यासक,दबंग तलाठी विनोदभाऊ खोब्रागडे वरोरा -चंद्रपूर मो.9850382426*