*समाजभुषण प्राचार्यद्वय सुधीर आकोजवार, संगिता मुलकलवार यांचे हस्ते सत्कार संपन्न*
*चंद्रपूर*
*स्थानिक महाकाली वार्डातील प.पु.गुरूवर्य नागाचार्य महाराज सभागृहात दि.२५ ला चंद्रपूर जिल्हा विश्वब्राम्हण पांचाळ समाज सेवा समितीच्या वतीने सन २०२१-२२ मध्ये ७५% गुण मिळवि-या गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या विविध वयोगटातील समाजातील व्यक्तींचा समाजभूषणद्वय डॉ.सुधीर मनोहरराव आकोजवार (प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर) व सौ.संगिताताई श्याम मुलकलवार (प्राचार्या, कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम अंबुजा फाॅऊंडेशन छिंदवाडा,(मध्य प्रदेश) यांचे शुभहस्ते मानचिन्ह , प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देवुन असंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी प्रमुख अतिथींचे सन्मानचिन्ह देऊन समाज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत व आदरातिथ्य केले.*
*याप्रसंगी प्राचार्य डॉ सुधीर आकोजवार यांनी विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी अभ्यासु प्रवृत्ती, चारित्र्य सांभाळत व संस्कारक्षम धडे घेत समाजात आपले नाव कमावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. तर प्राचार्या सौ.संगिताताई मुलकलवार यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाशिवाय पर्याय नाही तर शिक्षण घेवुन सुसंस्कृत होने ही काळाची गरज असुन ज्ञानाच्या जोरावर स्वत:चे भविष्य उज्ज्वल करता येवु शकते. समाजाला एकत्रीत आणण्याचे मोठे आव्हान आज आपल्या समोर असल्याचे मत प्राचार्या सौ.मुलकलवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण समिती अध्यक्ष विवेक आबोजवार यांनी केले.कार्यक्रमास समाजातील बंधु भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थित होती. मंचावर सर्वश्री मनोहररावजी आकोजवार,श्रीरामजी इत्तडवार, सुधाकर शिरपुरवार, प्रकाश कासार्लेवार, प्रा.अनुप कन्नोजवार, दिलीप लिंगोजवार,संतोष रामपेल्लीवार, गजानन कासार्लेवार , बंडू देवोजवार, शरद कत्रोजवार, आशाताई. विश्रोजवार, सुरेखाताई सुभाष आकोजवार, किर्तीताई एनगंटीवार, संगिता चोपावार आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.*