लालपेठ येथील सार्वजनिक विशाल शिवलिंगाचे महाशिवरात्री पर्वावर अभिषेक व पुजन

53

 

*(श्री दीपक कटकोजवार चंद्रपुर यांजकडून साभार प्राप्त )*
*आज दि.१८.२.२०२३ स्थानिक लालपेठ च्या माता नगरातील सार्वजनिक पुरातन महाशिवलिंगावर अभिषेक ,व मंत्रोपच्चारासह विधीवत पूजन चंद्रपूर शहर काॅंग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष व मनपा स्थायी समितीचे माजी सभापती श्री.नंदु नागरकर यांनी केले. याप्रसंगी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य,मनसे चे श्री.मनोज तांबेकर, आयोजक श्री.शंकर बल्लेपवार राजेंद्र आंखरे आदी मान्यवरांची सपत्निक उपस्थिती होती* *सौ.पुष्पा नागरकर,सौ.शुभांगी तांबेकर,सौ.मंगला आंखरे सह परिसरातील असंख्य भाविक महिला,पुरुष युवा भक्तांनी मोठी गर्दी केली होती. प्रसन्न व भक्तीमय वातावरणात भक्तमंडळी हरहरमहादेव चा उदघोष करताना दिसत होते*…