नागपुर येथील देशपांडे सभागृहात मंगळवारी “राष्ट्रपुरुष अटल” महानाट्य

66

*राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजन*

*नागपूर : देशाचे माजी पंतप्रधान, बहुआयामी व्यक्तिमत्व स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारे “राष्ट्रपुरुष अटल” हे महानाट्य राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने* *मंगळवारी, २७ डिसेंबर रोजी येथील स्व. वसंतराव देशपांडे* *सभागृहात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे.*
*नागपूर येथील प्रयास* *बहुउद्देशीय संस्थेद्वारा निर्मित या महानाट्यातून १७५ पेक्षा जास्त कलावंत सहभागी होणार आहेत.*
*महानाटय़ाच्या या प्रयोगाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री* *देवेंद्रजी फडणवीस, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरजी मुनगंटीवार आणि अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रयोगास राज्य मंत्रिमंडळाचे सन्माननीय सदस्य, विधान सभा / परिषदेचे सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत.*
*नागपुरातील रसिकांनी या महानाटय़ास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.*