वीर बाबुराव शेडमाके यांच्‍या नावाचे सभागृह हे स्‍फुर्तीस्‍थान व्‍हावे – ना. सुधीर मुनगंटीवार

43

*पोंभुर्णा येथील सभागृहाच्‍या लोकार्पणप्रसंगी ना. मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन.*

*दिला शब्‍द केला पूर्ण या उक्‍तीला जागुन राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्‍या नावाने ७५ लाख रू. खर्चाचे सभागृह बांधून त्‍यांचे लोकार्पण केले. वीर बाबुराव शेडमाके देशासाठी शहीद झाले, परंतु त्‍यांनी देशाच्‍या स्‍वातंत्र्यलढयात भाग घेणा-या अनेक तरूणांना प्रोत्‍साहीत केले. अशा स्‍वातंत्र्य संग्राम सैनिकाच्‍या नावाने सभागृह होणे ही आपल्‍या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे व हे सभागृह सर्वांसाठी स्‍फुर्तीस्‍थान व्‍हावे, असेही प्रतिपादन ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले.*

*याप्रसंगी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा नगर पंचायत उपाध्‍यक्ष अजित मंगळगिरीवार, भाजपा महिला जिल्‍हाध्‍यक्षा कु. अलका आत्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे, पोंभुर्णा तहसिलदार श्रीमती कनवाडे, नगर पंचायतचे मुख्‍याधिकारी आशिष घोडे, माजी जि.प. सदस्‍य राहूल संतोषवार, नगर पंचायतचे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, माजी पंचायत समिती उपसभापती ज्‍योती बुरांडे, विनोद देशमुख, माजी पंचायत समिती सदस्‍य गंगाधर मडावी, ऋषी कोटरंगे, पोंभुर्णा नगर पंचायतचे सर्व नगरसेवक व नगर‍सेविका, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

*याप्रसंगी पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्‍हणाले की जिल्‍हयामध्‍ये वीर बाबुराव शेडमाके यांच्‍या नावाने केमारा, चिंतलधाबा, आंबे धानोरा तथा बोर्डा दिक्षीत या ठिकाणी सभागृहाचे बांधकाम करण्‍यात आले. तसेच केमारा, देवई, भटारी, सातारा तुकूम, सातारा भोसले, आंबेधानोरा, बोर्डा दिक्षीत येथे सौंदर्यीकरण सुध्‍दा करण्‍यात आले. चंद्रपूरात वीर बाबुराव शेडमाके यांच्‍या नावाने एका मोठया स्‍टेडियमचे बांधकाम प्रस्‍तावित आहे. मिशन शौर्य अंतर्गत जिल्‍हयातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी सर्वोच्‍च माऊंट एव्‍हरेस्‍ट शिखर सर करून देशाचा नावलौकीक वाढविला. चंद्रपुरातील जिल्‍हा कारागृह परिसरात असलेल्‍या पिंपळाच्‍या वृक्षावर शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना फाशी देण्‍यात आली होती. तो वृक्ष व त्‍या सभोवलतालचा परिसर यांचे सौंदर्यीकरण करण्‍यात आले. आदिवासी समाजासाठी अनेक योजना आमच्‍या सरकारच्‍या काळात सुरू करण्‍यात आल्‍या आहेत व यापुढेही सुरू राहतील, अशी ग्‍वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.*