माँ जिजाऊ प्रतिष्ठाण

93

*साभार प्राप्त ???प्रा.निलकुमार बंगाले*

*निर्मिती व्यसनमुक्ती केंद्र*
*बुलढाणा जिल्हा दारूबंदी समिती*
लक्ष देउन वाचा….

महाराजांचं चित्र रंगवलेलं असतं की शिवाजी महाराज अफझल खानाचे पोट फाडत आहेत…. आणि खाली लिहिलेले असतं, दहशतवाद असाच संपवावा लागेल…

मराठ्यांच्या डोक्यात फिट कि मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही ….

आम्ही मराठा बंधुना समजावून सांगतो की शिवाजी महाराजांनी अफझल खानाचे पोट
फाडले…. हे खरे आहे…. पण अफझल खानाचे पोट फाडल्यानंतर कृष्णाजी भास्कर
कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही? याच्यावर चर्चा का होत नाही ?

शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असे चित्र का निर्माण केले जाते? कारण चारी बाजूंनी मुसलमान राजे महाराजांचे विरोधक होते…. पण मुसलमान राजे होते म्हणून काय शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होतात काय?

औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय? मिर्झा राजे काय मुसलमान होता काय? औरंगजेबाने आपले चार भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय? आपल्या बापाला अटक केली तो काय हिंदू होता काय?
या सर्व सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो….

शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता?
इब्राहीम खान…

शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता?
दौलत खान…

शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता?
सिद्दी हिलाल…

शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता?
नूर खान….

शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर….

शिवाजी महाराजांचा एकमेव वकील?
काझी हैदर…

शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव?
मीर मोहम्मद…

आणि शिवाजी महाराजांना अफझल
खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा?
रुस्तुमे जमाल…

एवढे जर मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय?

शिवाजी महाराजांचे ३१ अंगरक्षक होते त्या पैकी १० मुसलमान होते आणि अंगरक्षक काय करू शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा….

शिवाजी महाराजांनी एक हि मस्जिद पाडली नाही. एकही कुराण जाळले नाही. मग शिवाजी महाराजांचे नाव मुसलमानांवर हल्ले करताना का वापरले जाते? याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे….

रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे?
मंत्र्याने विचारले महाराज जागा दाखवा ….
महराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ?…. हा इतिहास
जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
आज महाराष्ट्रात एक आंदोलन चालू आहे कुठले ? … जय
शिवाजी !अन पाडा कबर !… कोणती कबर ?
रायगडाच्या पायथ्याशी अफझल खानची कबर ….
आम्ही पोरांना रोज सांगतो … कबर पाडा पण
बांधली कोणी ? … अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले …… जिजाऊनि विचारले
अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले मासाहेब
अफझल खान मारला गेला …. त्याचं प्रेत कुठ आहे ? ….
प्रतापगडाच्या पायथ्याशी …. काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत त्याच्याशी वैर
होते अफझल खान संपला(मेला ) आता वैर हि संपले …. अन
तुज्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही …. त्याच्या प्रेताचे सन्मानाने
दफन कर …आणि तुज्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे स्मारक
बांध …। . शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर
बांधली …. शिवाजी महाराजांनी ती कबर
बांधली …ती तोडुन आपण शिवबाला चुकिचे ठरवणार आहोत का ?
??????
प्रा.निलकुमार बंगाले
माँ जिजाऊ प्रतिष्ठाण
निर्मिती व्यसनमुक्ती केंद्र
बुलढाणा जिल्हा दारूबंदी समिती
टीपॉईंट जवळ मातृतिर्थ सिंदखेडराजा
मो.९९७५१०६९९९.९९७५१२६९९९