“गद्दारांना माफी नाही“

559

*अडीच वर्षे सरकार मध्ये एकत्र होते,तेव्हा तुमच्या स्वाभिमान कुठे गेला.??????????*.
*कुठे नेऊन ठेवले महाराष्ट्र माझा.????????????*

*साभार प्राप्त श्री विनोद* *खोब्रागडे तलाठी ( पटवारी )* *चंद्रपुर जिल्हा , महाराष्ट्र*

सुप्रीम,न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. काटजू म्हणतात,भारतात 99% लोक मुर्ख आहेत.????????
गरीब जनता,सरकारला प्रत्येक वस्तुवर ट्यँक्स भरत आहे.त्या ट्यँक्सचा आधारे राज्याचा,देशाचा कारभार चालत असतो.

मात्र काही काही खाजगी कंपन्या हजारो करोड रुपयांचा ट्यँक्स सरकारला भरत नाही,व ट्यँक्सची चोरी करतात,व सरकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.
ईथे प्रथम लक्षात घ्या,सरकार म्हणजे जनता आहे.आपण त्या लोकप्रतिनिधीनां पाच वर्षासाठी सरकार चालवायला देतो.

हा सर्व प्रकार शासन,प्रशासनातील वरिष्ठ IAS,IPS, अधिकारी यांना माहिती असते,मात्र ते सुद्धा या करचोरी भ्रष्टाचारात प्रतक्ष,अप्रतक्ष सामील असतात.त्यांचाच आशिर्वादाने हा सर्व गैर प्रकार सुरू असतो,हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे,म्हणूनच मी या भ्रष्टाचारी अधिकारी विरुद्ध अनेक वर्षांपासून बंड करीत आहे.

99% लोकप्रतिनिधी यांना हा सर्व गैरप्रकार माहिती असते,ते आपल्या अनेक पीड्या बसुन खातील ईतकी अमाप संम्पती सरकार मध्ये असतानां जमा करतात.

सरकार बदलले,की त्यांचा विचाराचे लोकप्रतिनिधी एकत्र सरकार मध्ये आले नाही,की पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून,केन्दीय यंत्रणा ED,CBI,त्यांचा मागे केंद्र सरकार लावून देते.

जेव्हा मग बंडखोर लोकप्रतिनिधी त्यांना जाऊन मिळतात,
तेव्हा त्यांचावरचे सर्व ED,CBI,बंद होतात.व पुन्हा धुतल्या तांदळा प्रमाणे स्वच्छ होतात.व पुन्हा भ्रष्टाचार करन्यास मोकळे होतात.

अशावेळी काही लोकप्रतिनिधी यांना बोलाविले नाही,तरीही स्वतः होऊन जातात.व आपला स्वाभिमान गहान ठेवतात.
व मतदाराशी गद्दारी करतात.हे बरोबर नाही.

काही काही लोकप्रतिनिधी यांचा भ्रष्टाचाराला पक्ष प्रमुख,मुख्यमंत्री यांनी सहकार्य केले नाही,तर कुठलेतरी कारण सांगुन सरकार पाडन्यासाठी काहीही करतात.

ज्या झाडावर बसून खेळले,मोठे झाले, भ्रष्टाचार मार्गाने करोडपती झाले,
शेवटी ते झाडच तोडायला लागले.
दुखः याचे आहे,की ज्या झाडाला कुराडीने तोडत आहेत,त्या कुराडीचा दांडा हा त्याच झाडाचा होता व आहे.
महाराष्ट्रातील 13 करोड जनतेला काही दिवसापासून काही लोकप्रतिनिधी जनतेचे महत्त्वाचे कामे सोडून मुर्ख बनवत आहेत.
आणि 99.99%जनता मुर्ख बनत आहे.
हि शोकांतिका आहे.
म्हणून मी हे मीडियावर मागील काही दिवसांपासून दुष्य उघड्या डोळ्यांनी पाहून व्यथीत होऊन लिहीत आहे,फुकट गेले माझे मतदान अशा लोकप्रतिनिधी साठी.पुढच्या वेळी विचार करुनच मतदान करनार.
जनतेने सुद्धा विचार करुनच मतदान करावे.
तुमचे एक मत किती किम्मती आहे.
हे सुरत,गुवाहाटी,वरुन लक्षात आले असेलच.
जनहीतार्थ जारी.