Google search engine
Home Chandrapur *सिने संगीत शौकीन मंच व करावोके कल्ब द्वारा स्व.आशाताई भोसले यांना संगीत...

*सिने संगीत शौकीन मंच व करावोके कल्ब द्वारा स्व.आशाताई भोसले यांना संगीत कार्यक्रमाने श्रद्धांजली अर्पण*

19

*सिने संगीत शौकीन मंच व करावोके कल्ब द्वारा स्व.आशाताई भोसले यांना संगीत कार्यक्रमाने श्रद्धांजली अर्पण*

सिने संगित शौकीन मंच व करावोके कल्ब च्या वतीने महान गायिका स्व. आशाताई भोसले यांना संगीत महफील च्या माध्यमातून सामुहिकपणे श्रद्धांजलीचा कार्यक्रम अतिशय भावनाप्रधान वातावरणात पांढरकवडा येथील अग्रसेन भवनात पार पडला. दानशूर विजयभाऊ कोंडावार व संगीत प्रेमी सौ.योगिता अनुपराव कोंडावार, परिवारातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात आयोजक विजय कोंडावार, सौ.चंदाताई, अनुप व सौ.योगिता , संयोजक दीपक अण्णा कापर्तीवार, प्रेमराव वखरे, शंकर सातपुते यांचे प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन व गणेश पूजनाने संपन्न झाली.
निवेदिका सौ. तेजश्रीताई यांनी स्व. आशा दीदींचे कार्याची महती वर्णन करून कार्यक्रमाचे औचित्य विषद केले. सर्वांनी एक मिनिट मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

*सौ योगिता अनुप कोंडावार, सौ. चंदाताई कोंडावार , विजय भाऊ कोंडावार, शंकर सातपुते, प्रेमराव वखरे, दीपक अण्णा कापर्तीवार दीप प्रज्वलन व पूजन करतांना.*
*सौ योगिता अनुप कोंडावार, सौ. चंदाताई कोंडावार , विजय भाऊ कोंडावार, शंकर सातपुते, प्रेमराव वखरे, दीपक अण्णा कापर्तीवार दीप प्रज्वलन व पूजन करतांना.*

सिने संगीत शौकीन मंच चे मुख्य संयोजक दीपक अण्णा कापर्तीवार यांनी आपले प्रस्ताविकात स्व.आशा दीदींचे संगीत सृष्टीतील महत्व विशारद करून “कराओके क्लब” चा सदर सातवां कार्यक्रम असून या माध्यमातुन घराघरातील प्रतिभावंत गायकांना बाहेर काढून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले असे सांगितले. अशा या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजनाचा आर्थिक भार अनुप कोंडावार यांनी त्यांच्या पत्नी सौ. योगिता कोंडावार यांचा संगीताचा छंद जोपासण्यासाठी उचलून सामाजिक बांधिलकी म्हणून अतिउत्कृष्ट आयोजन करून श्रोत्यांना संगीत मेजवानी दिली.

सुमारे ३८ गायक- गायिकांनी आपली एकापेक्षा एक सरस व सुंदर गीते सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. यावेळी रसिकांसाठी प्रारंभी थंड पेय म्हणून कच्च्या आंब्याचे पने , कार्यक्रमानंतर आईस्क्रीम व सुरुची भोज व्यवस्था चिमु कोंडावार यांनी केली होती. गायक व गायिकां शिवाय सुमारे १०० रसिकानी संगीत महफिलीचा आनंद लुटला. “न भूतो न भविष्यती” अशी मैफिल रंगल्याची चर्चा प्रेक्षक व श्रोत्यांमधुन ऐकायला येत होती.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अनुप कोंडावार, विजुभाऊ कोंडावार, कार्यक्रमाचे संयोजक दीपक अण्णा कापर्तीवार, जमीर शेख, नितीन धांदे आदींनी अतिशय परिश्रम घेतले. अशा या अभूतपूर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सौ. तेजश्री मानेकर यांनी आपल्या हिंदी-मराठी भाषेतुन अभ्यासपूर्ण शैलीत सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.