Google search engine
Home Breaking News आ. सुधीर मुनगंटीवार यांचा दिव्यांगाच्या विनंतीला २४ तासांत प्रतिसाद

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा दिव्यांगाच्या विनंतीला २४ तासांत प्रतिसाद

39
MLA Mungantiwar

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा दिव्यांगाच्या विनंतीला २४ तासांत प्रतिसाद

आ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती

दुसऱ्याच दिवशी थेट तीन चाकी सायकल घरी उपलब्ध करून दिली

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ दखल घेतल्यामुळे बालाजी वाढई यांना दिलासा

मुल – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची आज पुन्हा एकदा प्रचिती आली. मुल तालुक्यातील मारोडा येथील रहिवासी व दिव्यांग नागरिक श्री. बालाजी सुखदेव वाढई यांनी दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी मारोडा येथे आयोजित मोफत रेती वाटप कार्यक्रमात आ. मुनगंटीवार यांच्याकडे तीन चाकी सायकल मिळावी, अशी भावनिक विनंती केली होती. त्यावर चोवीस तासांच्या आत कृती करून आ. मुनगंटीवार यांनी तत्परतेचे दर्शन घडवले.

“दिव्यांग असल्यामुळे दैनंदिन हालचालींसाठी सायकल मिळावी” ही साधी पण अत्यंत महत्त्वाची मागणी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी मनापासून ऐकून घेतली. आणि तिची तात्काळ दखल घेत अवघ्या एका दिवसात, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी, मागणीप्रमाणे तीन चाकी सायकल थेट मारोडा येथे उपलब्ध करून देण्यात आली.

अवघ्या २४ तासांत सायकल पोहोचल्याने श्री. बालाजी वाढई यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून आले. ही केवळ सायकलची मदत नसून, एका संवेदनशील नेत्याने दिव्यांगाच्या वेदनेला समजून घेत दिलासा दिल्याचा मानवी स्पर्श आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल व संवेदनशीलतेबद्दल श्री. बालाजी वाढई यांच्या आईने मनापासून आभार व्यक्त केले असून, अशा संवेदनशील नेतृत्वामुळेच सामान्य नागरिकांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.