Google search engine
Home Breaking News हिंगणा- नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त

हिंगणा- नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त

91

 

हिंगणा- नागपूर (प्रतिनिधी) : दिनांक 3/10/2025 रोजी हिंगणा- नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल हिंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आयु विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर व पत्नी आयु अनुताई विनोद खोब्रागडे यांच्या पुष्पगुच्छ देऊन व पंचशील दुप्पटा गळ्यात टाकुन जाहीर सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु विनोद खोब्रागडे यांनी नागरिक व त्यांच्ये अधिकार व कर्तव्ये बाबत व कायद्याचे मार्गदर्शन अनेक उदाहरणे देऊन दिले, प्रबोधनकार संविधान शेंडे नागपूर व निशाताई धोंगडे म्याडम चंद्रपूर यांनी जबरदस्त प्रबोधन केले, परिसरातील मोठ्या प्रमाणात अनुयायी उपस्थित होते.