Google search engine
Home Breaking News मुस्लिम विकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ. सत्तार इनामदार यांचा सत्कार

मुस्लिम विकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ. सत्तार इनामदार यांचा सत्कार

88

 

हिंगणघाट (जि. वर्धा) – मुस्लिम विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार व प्रदेश उपाध्यक्ष शेख शेरू भाई हे हिंगणघाट दौऱ्यावर आले असता त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

हा सत्कार मुस्लिम विकास परिषद वर्धा जिल्हाध्यक्ष अॅड. इब्राहिम बख्श आझाद व सामाजिक कार्यकर्ता माधव गोपा यांच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी अॅड. इब्राहिम बख्श आझाद यांनी सांगितले की, “मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मुस्लिम विकास परिषद कार्यरत असून, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात परिषद ठोस पावले उचलत आहे. वर्धा जिल्ह्यातही परिषद समाजाच्या हितासाठी पुढाकार घेईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख शरीफ, पूर्णा तालुकाध्यक्ष शेख युसूफ भाई, तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.