Google search engine
51

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेतून आरक्षण रद्द केल्याप्रकरणी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे मनोज पोतराजे यांचे मागील काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या संदर्भात आज संघटनेच्या शिष्टमंडळासहित राज्याचे *मुख्यमंत्री श्री.देवेंद्र जी फडणवीस* यांच्यासोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सविस्तर बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवत हे सरकार आरक्षण विरोधी धोरण सहन करणार नसून लवकरच हा प्रश्न निकाली लावू असे सांगत आश्वस्त केले.