सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते कु. माधुरी कटकोजवार यांना बेस्ट प्रेस रिपोर्टर अवार्ड प्रदान आईसाहेब बहुउद्देशीय सामाजिक संस्था चंद्रपूरच्या वतीने दि.21 मार्च 2026 ला सायंकाळी 7 वाजता स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहाच्या भव्य मंचावर शेकडो चंद्रपूरकरांच्या साक्षिने भारत सरकारच्या सामाजिक न्याय खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री नामदार मा. रामदास आठवले साहेब यांच्या शुभहस्ते चंद्रपूर येथील जर्नलिस्ट कु. माधुरी कटकोजवार (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन तथा एम.ए. हिंदी गोल्ड मेड्यालीस्ट) यांना “बेस्ट प्रेस रिपोर्टर अवार्ड” प्रदान करुन गौरविण्यात आले आहे. यावेळी मंचावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे विदर्भ अध्यक्ष अरुण घोटेकर, जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) जिल्हाध्यक्षा प्रियाताई खाडे, आईसाहेब बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विक्कीराज वानखेडे , प्रभाकरराव खाडे, डॉ.आकाश जिवाने, सुनिल रामटेके, योगेश रायपुरे, ज्ञानेश्वर नगराळे, विवेक खाडे, संघर्ष उपरे, आशिष ताजने आदि मान्यवरांची उपस्थिती होती.





