Google search engine
Home Chandrapur राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून...

राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बल्लारपूर येथे भव्य स्वर्गीय सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृह साकार झाले आहे.

40

राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बल्लारपूर येथे भव्य स्वर्गीय सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृह साकार झाले आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, सुसज्ज प्रशिक्षण केंद्र आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कौशल्य विकासाला नवी चालना देणारी ही वास्तू त्यांच्या क्षमतेला अधिक व्यापक दिशा देणार आहे. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योगाधारित कौशल्ये आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून महिलांना सक्षम, आत्मनिर्भर आणि स्पर्धात्मक बनवण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

महिलांच्या कौशल्यांना ओळख देऊन त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभारण्यात आलेले हे सभागृह बल्लारपूरच्या सामाजिक-आर्थिक विकासाला गती देणारे ठरणार आहे. येथील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमधून महिलांना केवळ कौशल्ये आत्मसात करण्याची संधीच नाही, तर त्यांचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची प्रेरणाही मिळणार आहे. लवकरच या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून, महिलांच्या सबलीकरणाच्या वाटचालीत हे केंद्र एक नवे पर्व ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.