Google search engine
Home Breaking News व्यापारीक व्यवहारात धनादेशाचा अपमान – १,२७,०००/- रुपये भरपाईसह कारावासाची शिक्षा

व्यापारीक व्यवहारात धनादेशाचा अपमान – १,२७,०००/- रुपये भरपाईसह कारावासाची शिक्षा

65

*सदर केस मध्ये फिर्यादी व्यापारी इंद्रजीत मोटवानी ( संसार साडी सेंटर ,हिंगणघाट ) यांच्याकड़ून ॲड. इब्राहिम बख्श यांनी युक्तिवाद केला. तसेच ॲड. अश्विनी तपासे व ॲड. राहत पटेल यांनी सहकार्य केले.*
हिंगणघाट (जि. वर्धा) – स्थानिक न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देत चंद्रपूर येथील व्यवसायिका कल्पना मनोज रासेकर यांना चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरविले आहे. हे प्रकरण फिर्यादी इंद्रजीत प्रल्हाद मोटवानी (संसार साडी सेंटर, हिंगणघाट) यांनी दाखल केले होते.

इंद्रजीत मोटवानी यांनी आपल्या व्यापारी संबंधांतर्गत २०१९ पासून आरोपीस उधारीवर कपडे दिले होते. वर्ष २०२० मधील व्यवहारात आरोपीवर एकूण ₹१,३९,२९०/- रुपयांची देणी होती. आंशिक रकमेचे भरणे करूनही ₹१,०४,२९०/- इतकी थकबाकी उरली होती. यासाठी आरोपीने युनियन बँक, चंद्रपूर येथील धनादेश दिला. मात्र तो अपुर्‍या शिल्लकीमुळे (Funds Insufficient) दोन वेळा अपमानित (बाऊन्स) झाला.

कायद्यानुसार नोटीस देऊनही आरोपीने देयकाची पूर्तता केली नाही. परिणामी हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

माननीय न्यायाधीश अ. इ. शेख (अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी व संयुक्त वरिष्ठ न्यायाधीश, हिंगणघाट) यांनी आपल्या निर्णयात नमूद केले की, आरोपीने जाणीवपूर्वक अपुरी शिल्लक असलेला धनादेश दिला. फिर्यादीने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. आरोपीकडून कोणताही ठोस बचाव सादर करण्यात आलेला नाही.

न्यायालयाने आरोपीस १५ दिवसांची साधी कैद तसेच ₹१,२७,०००/- दंड भरण्याचे आदेश दिले. त्यापैकी ₹१,०४,२९०/- रक्कम ही फिर्यादीस भरपाई (compensation) म्हणून देण्यात येईल.

निकालानंतर फिर्यादी इंद्रजीत मोटवानी म्हणाले – “हा न्याय फक्त माझ्यासाठी नाही, तर प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या सर्व छोट्या व्यापाऱ्यांसाठी आहे. या निकालातून स्पष्ट होते की व्यापारी फसवणूक सहन केली जाणार नाही आणि न्यायालय लघु व्यापाऱ्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी नेहमीच उभे आहे.”

हा निर्णय व्यापारी जगतात एक आदर्श ठरत असून, धनादेश हा रोख रकमेच्या विश्वासार्ह पर्यायाप्रमाणे वापरण्यावरील विश्वास टिकवून ठेवणे ही न्यायालयाची प्राथमिकता असल्याचा ठोस संदेश यातून मिळतो.

फिर्यादी मोटवानी यांच्यावतीने ॲड. इब्राहिम बख्श यांनी युक्तिवाद केला. तसेच ॲड. अश्विनी तपासे व ॲड. राहत पटेल यांनी सहकार्य केले.फिर्यादी मोटवानी यांच्यावतीने ॲड. इब्राहिम बख्श यांनी युक्तिवाद केला. तसेच ॲड. अश्विनी तपासे व ॲड. राहत पटेल यांनी सहकार्य केले.