
,*मुल*.
*चार्मोशी फाटा, मुल येथे मोबाईल हिसकावून मोटारसायकलने फरार झालेल्या दोघा आरोपींना मुल पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.*
१५ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास एकारा येथील रहिवासी विवेक पांडुरंग कोटनाके (वय ३१) हे मौजा चार्मोशी फाटा-मुल रोडवरून जात असताना, मोटारसायकल (क्रमांक MH34-T-561) वरून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. यासंदर्भात मुल पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम ३०४, ३(५) भारतीय न्याय संहिता – २०२३ अन्वये गुन्हा क्रमांक २५५/२०२५ नोंदविण्यात आला.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत फिर्यादीच्या माहितीवरून व मोटारसायकल क्रमांकाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
1. तनिश ओम मंडलेकर (वय १९), रा. ताडाळा रोड, मुल
2. क्रिशन प्रेमदास शेडमाके (वय १९), रा. हळदी, ता. मुल
या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर, त्यांच्याकडून फिर्यादीचा पोको कंपनीचा मोबाईल (किंमत – ₹१०,०००/-) आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (किंमत – ₹५०,०००/-) असा एकूण ₹६०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या संपूर्ण कार्यवाहीत पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुल) श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजय राठोड यांच्या नेतृत्वात सपोनि श्री. सुबोध वंजारी, भोजराज मुंडरे, पो.हवलदार जमीरखान पठाण नापोअं नरेश कोडापे, शंकर बोरसरे, संदीप चुधरी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
*पुढील तपास मुल पोलीस स्टेशन चे कर्त्तव्य दक्ष अधिकारी व त्यांचा स्टॉफ करीत आहे*




