असलम ममदानी चा राष्ट्रवादी पार्टी कार्यालयात भव्य सत्कार संपन्न .

328

ब्यूरो चीफ अशरफ भाई मिस्त्री ✍️✍️✍️

प्रतिनिधि / कारंजा लाड
दिनांक 17/ 05 / 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय कारंजा येथे असलमजी मामदानी साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागच्या प्रदेश महासचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता. कारंजा च्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सामुहिक सत्कार करण्यात आला.

यावेळी कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष शेखर पाटील काटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कारंजा ता अध्यक्ष मनोज पाटील कानकिरड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष सुभान भाई कामनवाले , ओ बी सेल जिल्हा अध्यक्ष नितीन पाटील गाडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भाऊ दुर्गे, सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष योगेश भाऊ इंगळे, कारंजा खरेदी विक्रीचे संचालक अजय पाटील रंगे, ओ बी सेल तालुका अध्यक्ष ईश्वर पा ताठे, शहर सचिव हफीज भाई, मा. सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष गोपीभाऊ डेंडुळे,विनोद भाऊ करोसे, राहुल ढिके, व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.